Pensioner News : [विधानपरिषद लक्षवेधी] सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात सरकारचा मोठा निर्णय!

Pensioner News : राज्यातील सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्यात 4% वाढीचा शासनाने निर्णय घेतला असून, राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना याचा लाभ लवकरच थकबाकीसह मिळणार आहे, मात्र दरमहा वेतन (Salary) आणि निवृत्ती वेतन (Pension) बऱ्याचदा उशिरा होते, यासाठी आता शासनाने दरमहा वेतन वेळेत होण्यासाठी नुकतेच एक महत्वाचे परिपत्रक काढले आहे, विधानपरिषद लक्षवेधी मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन वेळेत होण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सविस्तर वाचा.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन वेळेत होणार

Pensioner News

जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतनाचे प्रदान वेळेत होण्यासाठी ग्रामविकास, शालेय शिक्षण आणि वित्त विभागामध्ये समन्वय साधून पुढील अधिवेशनापूर्वी कायमस्वरूपी कार्यप्रणाली अंमलात आणली जाईल, असे मा. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले. मा. सदस्य नरेंद्र दराडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, जिल्हा परिषदांना निधी वाटप, जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतन देयके कोषागारात सादर करणे व अंतिमत: जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतनाचे प्रदान करणे या कार्यपद्धतीकरिता लागणाऱ्या कालावधीमुळे निवृत्तीवेतन अदा करण्याच्या प्रक्रियेस विलंब होत आहे. हा विलंब टाळण्यासाठी समन्वयाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. [वेतन आणि निवृत्ती वेतन संदर्भात महत्वाचे परिपत्रक पहा]

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे

राज्यातील पावसाळी अधिवेशन सुरु असून, दिनांक 24 जुलै 2023 रोजी विधानपरिषद मध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, यासंदर्भात सविस्तर वाचा..

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post