PMSBY 2023 : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत काढा 20 रुपयात 2 लाखाचा विमा, ऑनलाईन अर्ज येथे करा

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana 2023 : सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र शासनाची एक महत्वपूर्ण सरकारी योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, PMSBY योजनेंतर्गत वार्षिक हप्ता फक्त 20 रुपये भरून 2 लाखाचा विमा कवच आणि अपघाताने दिव्यांग्त्व (अपंग) आल्यास 1 लाख रुपयाची मदत या सरकारी योजनेतून मिळते. Pradhan Mantri Suraksha Bima Yojana सविस्तर माहिती पाहूया...

20 रुपयात काढा 2 लाखाचा विमा

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana 2023

PMSBY ही सरकारची एक वर्षाची अपघात विमा योजना आहे. तिचे दरवर्षी नूतनीकरण करता येते. या योजनेअंतर्गत अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमा कवच लाभ घेता येतो.

दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्वाचे आहे. अनावधाने अपघात झाल्यास  अशा वेळी पूर्ण कुंटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना अत्यंत लाभदायी ठरणार आहे. (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) 

या योजनेचा विमा हप्ता केवळ 20 रुपये असून अपघातात पूर्णत: अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये व आंशिक अपगंत्व आल्यास 1 लक्ष रुपये मिळतात. बॅक खातेधारकांनी आपल्या बँकेत साधा अर्ज करावा.  

खात्यातून आपोआप ही विम्याची रक्कम वर्ग करण्यात येते. राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमात प्रत्येक बँकेत हा अर्ज भरुन घेण्याची सूचना आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana केंद्र शासनाची अपघात विमा योजना असून  मे 2015 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा विमा हप्ता 13 रुपये होता त्यामध्ये वाढ करुन आता फक्त 20 रुपये करण्यात आला आहे. 

वैशिष्ट्ये

 • PMSBY हा विमा वय 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 
 • लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 
 • योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होतो.  
 • हप्त्यासाठी आर्थिक वर्षे 1 जून ते 31 मे असेल. 
 • प्रत्येक बँकेत या संदर्भातील अर्ज आहे. 
 • खाते असणाऱ्या प्रत्येकाने हा अर्ज करणे आवश्यक आहे.

पात्रता

 • स्वतःचे बॅंक किंवा टपाल कार्यालयात खाते असणारी व्यक्ती. 
 • 18-70 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

 1. PMSBY ऑफलाईन अर्ज - प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन माध्यमातून अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुमचे ज्या बँकेत अकाउंट असेल तिथे जाऊन तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा फॉर्म भरून अर्ज सादर करावा.
 2. PMSBY ऑनलाईन अर्जप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे संबंधित बँकेचे इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ही सुविधा उपलब्ध असेल तर तुम्ही प्रत्यक्ष इंटरनेट बँकिंग लॉगिन करून हा विमा काढू शकता.

विमा लाभ कसा व केंव्हा मिळणार ?

लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला 2 लाख रुपये अर्थसाहाय्य मिळेल, लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये व आंशिक अपंगत्व आल्यास 1 लक्ष रुपये अर्थसाहाय्य दिले जाते.

 • खाते ऑटो व डेबिट करण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे. योजना न्यू इंडिया एश्योरेंस कंपनीशी संलग्नित आहे.
 • व्यवस्थापन - योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एल आय सी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो.महत्वाच्या योजना
Previous Post Next Post