राज्य सरकारची महिलांसाठी 'खास' योजना, या महिलांना मिळणार मोफत निवास व्यवस्था

Government Schemes for Women : राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध सरकारी योजना राबवीत असते, त्यामध्ये महिलांसाठी विशेष महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात, नुकतेच राज्य अर्थसंकल्पामध्ये (Budget 2023) महिलांना एसटी बस मध्ये सरसकट 50 टक्के भाडे सवलतीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचबरोबर आता राज्यातील महिलांकरिता (Government Schemes for Women) शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

महिलांसाठी मोफत निवास व्यवस्था 

नोकरी करत असलेल्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था करण्यात येणार आहे.

Government Schemes for Women

बोरिवली येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या दरम्यान संबंधित महिलांना अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

या महिलांना निवास व्यवस्था मोफत मिळणार

मोफत निवासाची व्यवस्था ही योजना नोकरी करत असलेल्या मागासवर्गीय महिलांकरिता आहे. त्याचबरोबर संबंधित महिला या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता

मोफत व्यवस्था योजना ही बोरिवली येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी आहे.

  • अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • तसेच महिलांचा प्रवर्ग हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात. 
  • अर्ज करण्याऱ्या महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल, तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले पत्र सादर करणे आवश्यक आहे. 
  • महिलांचे मासिक उत्पन्न 30 हजारांपेक्षा जास्त नसावे. 
  • वसतिगृहात जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत राहण्याची मुभा देण्यात येते. 
  • तसेच 5 हजार रु इतकी रक्कम अनामत म्हणून व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल.

अर्ज करण्यासाठी संपर्क

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, 4 था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई येथे संपर्क साधावा.

महत्वाच्या योजना

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              
Previous Post Next Post