मोठी बातमी ! विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, राज्यात कृषी सहायकांची बंपर भरती - Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023 : ग्रामीण भागातील कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी सेवकाची नियुक्ती केली जाते. राज्यातील विविध विभागामध्ये रिक्त असणाऱ्या जागांसाठी सरकारी भरती सुरु करण्यात आलेली आहे, कृषी सहायक या पदाची पदभरती जाहिरात काढण्यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. या लेखामध्ये Krushi Sevak Bharti 2023 जाहिरात कधी निघणार? Krushi Sevak पदांसाठी आवश्यक पात्रता , अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे.

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, राज्यात कृषी सहायकांची बंपर भरती - Krushi Sevak Bharti 2023 

krushi sevak bharti
krushi sevak bharti 2023

कोविड काळात आर्थिक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सरकारी पदभरतीवर निर्बंध होते. मात्र दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजीच्या वित्त विभाग शासन निर्णयाने हे निर्बंध शिथिल करण्यात आले असून, सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे.

कृषी सेवकाची राज्यात 1 हजार 439 पदांसाठी बंपर भरती

कृषी सहायकांची एकूण 1 हजार 439 पदे भरण्याबाबत 15 दिवसात कृषी सहायक पदाची जाहिरात येणार आहे. अशी महत्वपूर्ण माहिती राज्याचे कृषी मंत्री यांनी विधानसभेत दिली.

कृषी सहायक हे पदनाम बदलून, सहायक कृषी अधिकारी असे होणार

कृषी सहायक  हे पदनाम बदलून ते सहायक कृषी अधिकारी करण्याची मागणी आहे. यासंदर्भात संबंधित संघटना आणि राज्य शासन यांची बैठक घेऊन 15 दिवसात याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना मिळणार बढती

राज्यातील  उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या पदोन्नतीबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे मंत्री श्री.सत्तार यांनी सांगितले.

कृषी सेवक म्हणजे काय?

Talathi आणि Gramsevak यांच्या सोबत Krushi Sevak हे गाव पातळीवरील  महत्वाचे पद आहे. शेती हा देशाचा केंद्रबिंदू असून, शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देऊन सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृषी सेवक हे पद महत्वाचे आहे.

सरकारच्या कृषी विभागांतर्गत गाव पातळीवर कृषी  योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे प्रमुख काम या कृषी सेवक यांच्याकडून होते. तसेच कृषी शिबिरांचे आयोजन करणे, माती परीक्षण कार्यशाळा, आवश्यकतेनुसार शेती पिकांची पाहणी करून अहवाल तयार करणे, अशा स्वरूपाच्या कामांची जबाबदारी (krushi sahayak) कृषी सेवकांवर असते. 

कृषी सेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता

  • कृषी सेवक या पदासाठी उमेदवार हा कृषी पदविका डिप्लोमा किंवा समतुल्य पदवी धारक असावा.
  • कृषी सेवक पदासाठी संगणकांची परिपूर्ण माहिती असलेल्या MS-CIT कोर्स पूर्ण असणे किंवा नियुक्ती झाल्यापासून दोन वर्षात MS-CIT कोर्स पुर्ण करणे आवश्यक आहे.

कृषी सेवक पदासाठी वयोमर्यादा

सरकारी भरती साठी शासनाने वेळोवेळी ठरवलेली कमीत कमी १८ वर्ष व जास्तीत जास्त ३८ वर्ष (आरक्षण व इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त ४५ वर्षापर्यंत)  वयोमर्यादा लागू आहे.

कृषीसेवक परीक्षेचे स्वरुप 

  • कृषी सेवक पदासाठीची परीक्षा ही संगणक (Computer Based Examination) वर आधारित परीक्षा असते. 
  • कृषी सेवक पदासाठीच्या परीक्षेमध्ये २०० प्रश्न २०० गुणांसाठी असते. 
  • परीक्षेचा कालावधी २ तास असतो. 
  • परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असतात. प्रश्न हे मराठी, इंग्रजी, समान्य ज्ञान, बुद्धिमत्ता क्षमता चाचणी व अंकगणित आणि कृषी विषयक घटकावर विचारले जातात.

कृषी सहायक पदभरती पंधरा दिवसात - Krushi Sevak Bharti 2023

कृषी विभागातील पदांबाबतचा आकृती बंधाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम पूर्ण करुन कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात येईल. कृषी सेवक पदभरतीची जाहिरात येत्या १५ दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्या


प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post