MSRLM : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक

Maharashtra State Rural Livelihood Mission : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राज्यभरातील गेल्या १० ते १२ वर्षापासून ३ हजार पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत, शहरापासून ते ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी करण्याचे महत्वपूर्ण काम हे कर्मचारी करत आहेत, या कंत्राटी तत्वावरील कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांच्या मानधन वाढ, MSRLM (Maharashtra State Rural Livelihood Mission) केडर नियुक्तीवरील बंदी उठविणे, पदोन्नती, बदल्या तसेच मानधनातील तफावत व कर्मचारी संघटनेला शासन मान्यता आणि बचत गटांना खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी इ महत्वपूर्ण विषयावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये संपन्न कार्यक्रमात सांगितले.

MSRLM : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक

umed msrlm contract employees salary increase

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान म्हणजेच MSRLM (Maharashtra State Rural Livelihood Mission) हे अभियान राज्यात २०११ साली सुरु झाले, यांतर्गत उमेद MSRLM या सरकारी योजनेची अंबलबजावणी करण्यासाठी महिलांना सक्षम करण्याचे महत्वपूर्ण काम MSRLM कंत्राटी कर्मचारी राज्यभरात करत आहे.

महिलांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास, महिला आणि बालविकास अशा विविध विभागांच्या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्याचे काम सातत्याने सुरु आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी अनेक विशेष महत्वाचे निर्णय घेतले, तर काही नव्या योजना जाहीर केल्या आहे. 

या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून महिला सक्षमीकरणाला बळ देण्याचे काम केले जाणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना, महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. लवकरच राज्याचे ४ थे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महिला बचत गटातील महिलांची संख्या ३ कोटीवर नेण्याचे लक्ष

महिलांना आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच त्यांची आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून ‘उमेद’ च्या वतीने सुरु असलेल्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. विविध बचत गटांमध्ये सध्या ६० लाख महिला सहभागी असून ही संख्या ३ कोटींवर नेण्यासाठी ‘उमेद’ मधील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

उमेद - MSRLM कंत्राटी कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लागणार - मुख्यमंत्री

‘उमेद’ MSRLM मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या विषयावर शासन सकारात्मक असून, कर्मचारी मानधन वाढ, केडर नियुक्तीवरील बंदी उठविणे, पदोन्नती प्रक्रिया पूर्ववत राबविणे, विनंती बदल्या प्रक्रिया राबविणे, मानधनातील तफावत दूर करणे, कर्मचारी संघटनेला शासन मन्यता, ‘उमेद’ मधील स्वयंसहायता बचत गटांना खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी आदी विषयांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

उमेद (MSRLM) महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने सह्याद्री राज्य अतिथीगृहात संपन्न आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे बोलत होते.


महत्वपूर्ण बातम्या

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             


Previous Post Next Post