आनंदाची बातमी ! राज्यातील सरकारी दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे मिळणार वाहतूक भत्ता - Transport Allowance

Transport Allowance to Disabled Employees राज्य शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वाहतूक भत्ता दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील प्रश्नोत्तरेच्या तासाला दिली. 

विधान परिषदेचे सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सातव्या वेतन आयोगानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचार्यांना वाहतूक भत्ता मिळावा, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. 

केंद्र शासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता ठरवून दिलेला आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारने राज्य शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता निश्चित केला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. 

सहाव्या आणि सातव्या वेतन आयोग आणि केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे. 

सातव्या वेतन आयोगानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता - Transport Allowance

Transport Allowance to Disabled Employees

शहरी भागाकरीता 10 हजार 800, 5 हजार 400, 2 हजार 250 

आणि इतर ठिकाणांसाठी 

रु 5 हजार 400, रु 2 हजार 700 आणि रु 2 हजार 250 वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

हा भत्ता रुपये 2 हजार 250 पेक्षा कमी असू नये, असेही तत्त्व केंद्र सरकारने ठरविले आहे. त्याप्रमाणेच राज्य शासनाची भूमिका असल्याचे ते म्हणाले

अ.क्र कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेले ग्रेड वेतन अ-1 आणि अ वर्ग शहरे इतर ठिकाणे
1 एस - 20 व त्यावरील वेतन स्तर ग्रेड पे 5400 वर रु 10800 रु 5400
2 एस- 7 ते एस - 19 ग्रेड पे 2000-5000 रु 5400 रु 2700
3 एस- 1 ते एस - 6 ग्रेड पे 1300-1900 रु 2250 रु 2250

संबंधित बातम्या

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post