गुढीपाडव्याच्या जनतेला शुभेछ्या देत मुख्यमंत्र्यांनी सांगितला नव्या वर्षाचा संकल्प - Gudi Padwa CM Wishes 2023

Gudhi Padwa CM Wishes 2023 : गुढीपाडव्याच्या पूर्व संधीला जनतेशी संवाद साधत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नववर्ष सणाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या, आपले महाराष्ट्र राज्य प्रगतीशील आहे. नवनव्या संधींना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि आणखी डौलाने उभारूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Gudhi Padwa Wishes

नवे वर्ष आरोग्यदायी ठरावे. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी मनोकामनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

गुढीपाडवा नववर्षाचा संकल्प

मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चैतन्याचे पर्व घेऊन येते. या निमित्ताने आपण ऋतुचक्रातील बदलाचा आनंददायी उत्सव साजरा करतो. अशा या नववर्षाच्या उत्साही क्षणांतून आपल्याला नवनिर्मितीची प्रेरणा मिळते. ही प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा यासाठी प्रयत्न करूया.

नववर्षाचे स्वागत करताना आपण पर्यावरणाचे भान देखील बाळगूया. आपल्या परिसरात स्वच्छता राखूया. पाणी, हवा यांचं प्रदूषण रोखण्याची जागरुकता निर्माण व्हावी, असे प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मनात नवसंकल्पनांची पालवी फुलावी, हीच सदिच्छा. महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी उंच उभारूया, तिची पताका जगाच्या क्षितिजावर अभिमानाने आणि डौलाने फडकत राहावी, असा निर्धार करूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

गुढीपाडवा शुभेछ्या संदेश - Gudi Padwa Wishes In Marathi

सोनेरी पहाट,

उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण,

अन सुखांची बरसात..

दिवस सोनेरी,

नव्या वर्षाची सुरुवात..

गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!


सर्वांना निरोगी आयुष्य लाभो,

हीच या शुभदिनी सदिच्छा!

गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


"नेसून साडी माळून गजरा

उभी राहिली गुढी,

नव वर्षाच्या स्वागताची

ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी

नटले सारे अंगण,

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन

सुगंधित जसे चंदन…

नूतनवर्षाभिनंदन !!"


महत्वपूर्ण बातम्या

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post