मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील कोतवालांच्या मानधनात 'दुप्पट' वाढ, आता मिळणार दरमहा 15 हजार रुपये

Kotwal Salary Increase News : राज्य सरकारने राज्यातील कोतवालांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 24 दिनांक 9 मार्च 2023 रोजी सादर करण्यात आला होता, त्यामध्ये कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याबाबत 17 मार्च 2023 च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

कोतवालांचे मानधन आता 7 हजार 500 वरून थेट 15 हजार रुपये

Kotwal Salary Increase News

महसूल विभागामार्फत गाव पातळीवर राज्यात 1959 पासून कोतवाल हे पद अस्तित्वात आहे, त्यावेळी त्यांना केवळ १६ रूपये इतके मानधन देण्यात येत होते. 

कोतवाल हे तलाठ्याच्या सहकार्याने गाव पातळीवर विविध कामे करत असतो. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ होण्याची मागणी होती. आता त्यांना एकूण दरमहा 15 हजार इतके मानधन मिळणार आहे. 

कोतवाल यांच्या मानधनात दुप्पट वाढ

राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला अर्थ विभागाची मान्यता मिळाली असून, आता कोतवालांचे मानधन 7 हजार 500 वरून थेट 15 हजार रुपये इतके करण्यात आले आहे.

कोतवालांच्या मानधनात एकूण 8 हजार रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे कोतवाल या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्यातील 12 हजार 793 कोतवालांच्या मानधनात वाढ

सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन 7 हजार 500 इतके होते. राज्यभरात गावपातळीवर काम करणारे एकूण 12 हजार 793 कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट 15 हजार इतके मानधन मिळणार आहे. हे मानधन दि. 1 एप्रिल 2023 पासून लागू असणार आहे. असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.महत्वपूर्ण बातम्या
प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू होणार

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                            

Previous Post Next Post