'World Health Day' 2023 : जागतिक आरोग्य दिनानिमित्त 'निरोगी' दीर्घ आयुष्यासाठी 'हा' करा संकल्प

World Health Day 2023 : वर्षभरामध्ये प्रत्येक महत्वाच्या दिवसाला विशेष असे महत्व आहे, त्याप्रमाणे 7 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो, यंदा 75 वा वर्धमान जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे, या वर्षीची थीम ही 'Health for All' अशी आहे. म्हणजेच आरोग्य हे प्रत्येक मानवाची मूलभूत गरज आणि अधिकार आहे असे सूचित करते, यानिमित्ताने आज आपण निरोगी दीर्घ आयुष्यासाठी 10 मिनिटे देण्याचा संकल्प करूया आणि आपले आरोग्य सदृढ ठेऊया..

जागतिक आरोग्य दिन थीम - World Health Day Theme 2023

World Health Day

Health For All Theam Of World Health Day 2023 : दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो, यंदाही जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवसानिमित्त World Health day Theme 2023 - यंदाच्या जागतिक आरोग्य दिवसाची थीम 'Health for all' अशी ठेवली आहे.

आरोग्य दिन साजरा करण्यामागे काय उद्देश आहे?

हा दिवस साजरा करण्यामागचा एकच उद्देश आहे, जगभरातील लोकांना त्यांच्या आरोग्याचं महत्व पटावं. कोव्हिड दरम्यान सर्वजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहे.

त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित महत्वाच्या गोष्टी, नवीन औषधांचा शोध, विविध लसिकरण या विषयीच्या माहितीची जागरुकता वाढवी हाच या पाठीमागाचा प्रमुख उद्देश आहे.

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास 

जागतिक आरोग्य (WHO) संघटनेच्या स्थापनेनंतर जागतिक आरोग्य दिनाची सुरुवात झाली. 

सन 1948 मध्ये जगातल्या अनेक देशांनी एकत्र येऊन आरोग्याला प्रोत्साहन आणि रोगापासून बचाव करण्याचा निश्चय केला. 

7 एप्रिल 1950 मध्ये पहिला जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला.

तेव्हापासून हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

निरोगी दीर्घ आयुष्यासाठी द्या 'दहा' मिनिटे

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हा महान विचार आपल्याला खूप काही सांगून जातो. गंजण्यापेक्षा झिजणं कधीही चांगलं. शरीराचे देखील तसेच आहे. 

शरीराला जशी आहाराची आवश्यकता भासते. तशीच व्यायामाची देखील आवश्यकता असते. 

तेव्हा निरोगी दिर्घआयुष्यासाठी आपल्याला दररोज किमान 10 मिनिटे तरी चालायलाच हवं. 

ऋतूनुसार फळे खा आणि तंदुरुस्त रहा

ज्या प्रमाणे नवीन वर्षात आपण नवनवीन संकल्प करतो, त्याच प्रमाणे आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपले आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी दररोज किमान 10 मिनिटे वेगाने चालण्याचा संकल्प करूया. आरोग्य धनसंपदा !


महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                            

Previous Post Next Post