'युवा संगम' कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन सुरु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले युवकांना आवाहन, येथे करा नोंदणी

Yuva Sangam Program Phase 2 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ (Ek Bharat Shreshtha Bharat) अंतर्गत ‘युवा संगम’ (Yuva Sangam Phase 2) कार्यक्रमास सुरूवात झाली आहे, या कार्यक्रमासाठी 18 ते 30 वर्ष वयोगटातील युवकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती या विशेष लेखामध्ये पाहूया.

एक हजार युवकांना मिळणार संधी

Yuva Sangam Program Phase 2

देशाचे प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला Ek Bharat Shreshtha Bharat अंतर्गत ‘युवा संगम’ (Yuva Sangam) या कार्यक्रमात देशभरातील जवळपास 1000 युवकांना सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांबरोबर इतर 30 वर्ष वयोगटातील युवक यांना संधी मिळणार असून, त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

युवकांना नोंदणी करण्याचे आवाहन

'युवा संगम' कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले, 'मी पहिल्या टप्प्यात झालेल्या विविध #YuvaSangam कार्यक्रमाचे अप्रतिम छायाचित्रे आणि चित्रफीती पाहतोय. 

'एक भारत श्रेष्ठ भारत' ची भावना वृद्धिंगत करण्याचा हा उत्कृष्ट मार्ग आहे. आता, मी तरुणांना दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करतो.'

असा असेल, युवा संगम 2 कार्यक्रम | Yuva Sangam Phase 2

युवा संगम टप्पा 2 साठीची नोंदणी ऑनलाइन पोर्टलद्वारे सुरू झाली. यामध्ये भारतातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1000 तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. 

या उपक्रमांतर्गत, एक्सपोजर यात्रा एप्रिल आणि मे 2023 मध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. या माध्यमातून 45 ते 50 युवकांचा गट दोन राज्यात एकत्र यात्रा करेल.

ही यात्रा सहभागी युवकांना पर्यटन, परंपरा, प्रगती, व्यावसायिक (तंत्रज्ञान) आणि परस्पर संपर्क ( लोकांमधील संवाद) या पाच विस्तृत क्षेत्रांतर्गत विविध पैलूंचा एक प्रभावी, बहुआयामी अनुभव प्रदान करणार आहे.

या कार्यक्रमात विद्यार्थी भाषा, साहित्य, पाककृती, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यटन या क्षेत्रांतल्या आपल्या अनुभवांबद्दल एकमेकांशी संवाद साधतील. थोडक्यात, त्यांना प्रथमच पूर्णपणे भिन्न भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत जगण्याचा अनुभव मिळेल

 ‘युवा संगम’ कार्यक्रम काय आहे?

‘युवा संगम’  कार्यक्रमाचा पहिला टप्पा नुकताच फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये संपन्न झाला, या कार्यक्रमात जवळपास 1200 युवकांनी सहभाग घेतला होता.

आणि त्यांनी 29 यात्रांद्वारे भारतातील 22 राज्यांना भेटी दिल्या होत्या. या युवा संगममुळे सहभागी युवकांना खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा एक भारत श्रेष्ठ भारताचा अनुभव मिळाला.

 

देशातील ईशान्येकडील राज्ये आणि  इतर राज्यांमधील युवक-युवतींना परस्परांशी जोडणे  तसेच त्यांच्यात  परस्परांना जाणून घेण्याची  क्षमता निर्माण करणे  या उद्देशाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 'एक भारत श्रेष्ठ भारत' अंतर्गत ‘युवा संगम’ या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.  

युवा संगम’च्या माध्यमातून 18 ते 30 वर्षे वयोगटातील तरुणांना देशातील विविध राज्ये पाहणे, त्यांची कला, संस्कृती, भाषा समजून घेण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील तरुणांमध्ये संवाद व्हावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमात 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 1 हजार तरुणांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यटन, परंपरा, प्रगती, व्यावसायिक, तंत्रज्ञान आणि परस्पर संवाद यावर भर देण्यात येणार आहे.

युवा संगम कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन येथे करा | Yuva Sangam Registration Portal

Ek Bharat Shreshtha Bharat अंतर्गत युवा संगम कार्यक्रमासाठी18 ते 30 वयोगटातील युवकांनी  9 एप्रिल 2023 पर्यंत Yuva Sangam official websitehttps://ebsb.aicte-india.org या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

{getButton} $text={Registration Link} $icon={link}

 ‘युवा संगम’ कार्यक्रमाचा उद्देश

एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत ‘युवा संगम’ या उपक्रमाची संकल्पना विविध मंत्रालयांच्या सहयोगी प्रयत्नांच्या रूपाने साकार झाली, ज्याचा उद्देश लोकांना लोकांशी जोडणे आणि देशभरातील युवकांमध्ये परस्पर सहानुभूती निर्माण करणे हा आहे. 

हा उपक्रम या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या हजारो तरुणांमध्ये समंजसपणाची आपलेपणाची भावना जागृत करत आहे, जिचा प्रसार देशभरात होत जाईल आणि खर्‍या अर्थाने श्रेष्ठ भारत निर्माण करण्यात मोठे योगदान देईल.

हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              
Previous Post Next Post