'आरटीई' 25 टक्के लॉटरी प्रवेशाचे 'वेळापत्रक' जाहीर, अंतिम प्रवेश या तारखेला मिळणार

RTE Lottery Result Maharashtra 2023 : राज्यातील बालकांसाठी शिक्षण हक्क कायदा (RTE Act) 2029 अन्वये खाजगी शाळांमध्ये आर्थिक व वंचित घटकातील बालकांसाठी 25 टक्के जागा राखीव जागांसाठी, दरवर्षी राज्यस्तरावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. पुढील शैक्षणिक वर्ष 2023 24 च्या प्रवेशासाठी 5 एप्रिल 2023 रोजी RTE ची सोडत जाहीर करण्यात आली, मात्र अंतिम यादी निकाल RTE Lottery Result Maharashtra 2023 पाहण्यासाठी पालकांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे. 'आरटीई' 25 टक्के लॉटरी ते प्रवेशा पर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्याबाबतची माहिती येथे वाचा 

'आरटीई' 25 टक्के लॉटरी प्रवेशाचे 'वेळापत्रक' जाहीर

RTE Lottery Result Maharashtra 2023

'आरटीई' प्रवेशाची ऑनलाइन सोडत जाहीर

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2029 नुसार राज्यातील खासगी शाळांमधील RTE 25 टक्के राखीव जागांवरील Lottery Result   प्रवेशाची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात आली. महानगरपालिकेच्या गोगटे शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते SCERT परिषदेच्या सभागृहात सोडत काढण्यात आली. 

राज्यात आरटीई अंतर्गत 8 हजार 828 शाळांमधील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 64 हजार 390 अर्ज आले आहेत. शिक्षण विभागाने बुधवारी आरटीई प्रवेशासाठी सोडत काढली असली तरीही NIC कडे लॉटरीद्वारे काढलेले क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी दिले जाणार आहेत. 

या वेळी राज्याचे शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीतसिंह देओल , शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षण विभागाच्या योजना विभागाचे संचालक महेश पालकर, एनआयसीचे उपमहासंचालक अशोक कौल उपस्थित होते. 

'आरटीई' लॉटरी ची अंतिम निवड यादी या तारखेला मिळणार | RTE Lottery Result 2023

राज्यातील 8 हजार 828 शाळांसाठी आरक्षण , आर्थिक व वंचित घटकातील अर्जानुसार प्रत्येक जिल्हानिहाय प्रत्येक शाळेसाठी एकूण 12 राउंड पद्धतीने सोडत काढली जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून एक आठवड्याचा कालावधी जाणार आहे. 'आरटीई' लॉटरी ची सोडत प्रक्रिया कशी पार पडते? येथे पहा

'आरटीई' लॉटरीची अंतिम निवड व यादी 12  एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपासून निवड झालेल्या मुलांच्या प्रवेशाबाबतचे संदेश (SMS) मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येणार आहे. तसेच RTE च्या Portal वर जाऊन लॉगीन सेक्शन मध्ये देखील याबाबत माहिती मिळेल. RTE Portal Click Here

{getButton} $text={RTE पोर्टल} $icon={link}

'आरटीई' 25 टक्के प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

'आरटीई' सोडत काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे आता पुढील प्रवेशाचा संपूर्ण कार्यक्रम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, त्यामध्ये 5 एप्रिल ते 12 एप्रिल 2023 या दरम्यान राज्यातील 8 हजार 828 शाळांसाठी अर्जानुसार सोडत काढण्याचे काम सुरु राहणार आहे.

त्यानंतर 13 ते 8 मे 2023 कागदपत्रे पडताळणी होणार आहे. कागदपत्रे पडताळणी नंतर तालुका शिक्षण समिती तुमचा अर्ज पुन्हा Verify करून तुमच्या बालकांचा प्रवेश अंतिम करण्यात येईल.

त्यानंतर 25 एप्रिल ते 8 मे 2023 या कालावधीत संबंधित शाळेत बालकांचा प्रवेश घ्यावा लागणार आहे.

अ.क्र. विषय कालावधी
1 RTE सोडत 5 एप्रिल ते 12 एप्रिल 2023
2 निवड झालेल्या बालकांना SMS 12 एप्रिल दुपारी 3
3 कागदपत्रे/प्रवेश 13 एप्रिल ते 8 मे 2023

'आरटीई'  25 टक्के प्रवेशासाठी फसवेगिरी एजंट पासून सावधान

'आरटीई' नुसार 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राज्याच्या शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येते. यामध्ये प्रवेश क्षमतेएवढ्या विद्यार्थ्यांना सोडतीद्वारे प्रवेश दिला जातो. 

पालकांनी या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणत्याही एजंट फसवेगिरी किंवा संस्थांच्या प्रलोभनांना बळी पडू नये. असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

बालकांना खाजगी शाळेत दुय्यम वागणूक दिल्यास होणार कारवाई

'आरटीई' 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर दुजाभाव किंवा दुय्यम वागणूक दिली जात असल्याची माहिती  समोर आल्यास संबंधित शाळेविरोधात कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण प्रधान सचिव यांनी RTE ऑनलाईन सोडतीच्या कार्यक्रमात दिली. 

त्यामुळे आता अशा शाळांना सर्वसमावेशक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागणार आहे, कोणीही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करता येणार नाही, यामुळे पालकांना याबाबत दिलासा मिळाला आहे. 

आरटीई प्रवेश प्रक्रीयेदरम्यान काही अनुचित प्रकार घडत असतात, त्यामध्ये प्रवेशाची हमी देणाऱ्या एजंटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासनही शिक्षण विभागाने दिले आहे.

हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              
Previous Post Next Post