निर्णय ! राज्यातील कर्मचाऱ्यांच्या 'वारसांना' नवीन पेन्शन योजनेचा मिळणार लाभ शासन निर्णय जारी

New Pension Scheme : अंशदान निवृत्तिवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तिवेतन (Pension Scheme) प्रणाली योजना ही राज्यातील 2005 नंतर सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचार्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे, राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना Family Pension Gratuity देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, तसा शासन निर्णय 31 मार्च 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

केंद्राच्या धर्तीवर राज्यातील कर्मचार्यांना पेन्शन लाभ लागू

केंद्र शासनाच्या  (Implementation of National Pension System Rules 2021) नुसार सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तिवेतन (Family Pension-Gratuity) अथवा रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तिवेतन  देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

NEW Pension Scheme

तसेच केंद्र शासनाच्या Central Civil Services (Payment of Gratuity under National Pension System) Rules, 2020 नुसार केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यु उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचान्यांना सेवा उपदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

केंद्र शासनाच्या वरील निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, तसा शासन निर्णय 31 मार्च 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी निर्णय काय आहे?

  1. सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान लाभ मिळणार आहे. (फॅमिली पेंशन(जुनी पेंशन) आणि सोबत डेथ ग्रॅच्युटी (मृत्यू उपदान) लाभ)
  2. रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचान्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात आली आहे. (सेवेत असतांना जखम/इजा/आजारपण इत्यादिमुळे सेवा समाप्त झाल्यास रुग्णता निवृत्तीवेतन (जुनी पेंशन) आणि सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी(सेवा उपदान) लाभ)
  3. शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात आले आहे. (सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर पूर्वीप्रमाणे रिटायरमेंट ग्रॅच्युटी (सेवा उपदान.)

उपदान रक्कम म्हणजे काय?

उपदान म्हणजे शासनाकडून कर्मचाऱ्यांना मिळालेली रक्कम आहे, ही उपदान रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीवर अवलंबून असते.

उदाहरण - 

  • समजा 1 वर्ष च्या आत सेवा - असल्यास मिळणारे उपदान- 
  •  अंतिम वेतनाच्या दुप्पट रक्कम मिळते.
  • 1 वर्ष ते 5 वर्ष सेवा- मिळणारे उपदान- अंतीम वेतनाच्या 6 पट रक्कम,
  • 5 वर्ष ते 11 वर्ष सेवा- उपदान - अंतिम वेतनाच्या 12 पट रक्कम
  • 11 वर्ष ते 20 वर्ष दरम्यान सेवा, उपदान - अंतिम वेतनाच्या 20 पट रक्कम
  • 20 वर्ष पेक्षा जास्त सेवा, उपदान  अंतिम वेतनाच्या 33 पट रक्कम
  • (कमाल मर्यादा 14 लाख..₹) 

महत्वपूर्ण बातम्या

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                            




Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post