मोठी बातमी! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ! महत्वाचे शासन परिपत्रक जारी, सविस्तर वाचा..

Old Pension Scheme Latest News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट बातमी, जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या बेमुदत संपानंतर राज्य सरकारने दिनांक 31 मार्च 2023 रोजी परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना (DCPS), राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतील कुटुंब निवृत्तिवेतन, मृत्यु उपदान, रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान इत्यादी लाभ देय केले आहे. मात्र या उपदान सेवेचा लाभ देण्यासाठी कार्यपध्दतीबाबतच्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आता वित्त विभागाने दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी एक शासन परिपत्रक जारी केले होते. त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली असून, दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी शासन शुद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. सविस्तर वाचा...

$ads={1}

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ!

Old Pension Scheme Latest News

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक ३१ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना (DCPS), राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन (Family Pension) आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे. [दिनांक 31 मार्च 2023 रोजीचा  शासन निर्णय येथे पहा]

या उपदान सेवेचा लाभ देण्यासाठी कार्यपध्दतीबाबतच्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आता वित्त विभागाने दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी एक शासन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार

दिनांक ३१ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यरत असणाऱ्या ज्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास किंवा तो रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास यथास्थिती त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन/ त्याला रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याचा विकल्प नमुना- २ मध्ये सादर केला आहे, अशा कर्मचाऱ्याला तो सेवानिवृत्त होईपर्यंत सदरचा विकल्प बदलण्याची मुभा असणार आहे. 

मात्र विकल्प देणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार असल्यामुळे कर्मचाऱ्याने तो हयात असताना दिलेला विकल्प, त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या कुटुंबियांना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.

हे ही वाचा - उपदान रक्कम म्हणजे काय? -फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी निर्णय काय आहे?

कर्मचाऱ्याने वेळोवेळी सादर केलेल्या विकल्पाची नोंद आहरण व संवितरण अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात तत्परतेने घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.

दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजीचे शासन शुद्धीपत्रक येथे पहा

$ads={2}

दिनांक 31 मार्च 2023 रोजीचा  शासन निर्णय येथे पहा
दिनांक 24 ऑगस्ट 2023 शासन परिपत्रक डाउनलोड करा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post