Maha Teacher Recruitment News : राज्यातील 30,000 शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू! शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर; प्रसिध्दी निवेदन सविस्तर वाचा...

Maha Teacher Recruitment News : राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदापैकी 30 हजार पदे 'पवित्र' प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असून, त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणी 22 फेब्रुवारी, 2023 ते 3 मार्च,2023 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली होती. परीक्षेमध्ये उमेदवारांस प्राप्त गुणांकनाच्या आधारे राज्यात अंदाजे 30 हजार शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही सुरू सध्या आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयाने एक महत्वाचे प्रसिद्धी निवेदन जाहीर केले आहे. सविस्तर वाचा..

$ads={1}

राज्यातील 30,000 शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू!

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. 

सदर परीक्षेचा निकाल दि. २४/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक (SCORE CARD) http://ibpsonline.ibps.in/mscepjan23/seda_mar23/login.php?appid=307b76e19820efd6b5d4822113cce69 वेबलिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात आले होते. सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती.

हे ही वाचा -  अखेर प्रतीक्षा संपली! राज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती!

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ या परीक्षेचा निकाल दि. २४/०३/२०२३ रोजी लागला. तदनंतर उमेदवारांच्या माहितीसाठी दिनांक २०/०४/२०२३ पर्यंतः उमेदवारांच्या लॉगिनमध्ये त्यांचे गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात आले होते. उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करणेबाबत या कार्यालयाच्या दिनांक ३१/०३/२०२३ च्या प्रसिध्दी निवेदनाव्दारे सूचना देण्यात आली होती. दिनांक २०/०४/२०२३ नंतर याबाबतीत आलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही असे सूचित करण्यात आले होते. तरी सद्यास्थिती मध्ये सदर वेब लिक बंद करण्यात आली आहे.

सदर गुणपत्रक हे आपल्या माहितीसाठी असून आपण सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या गुणयादीची प्रिंट काढून आपण ती माहितीसाठी वापरु शकता. पवित्र पोर्टल संबंधित गुणयादी परीक्षा परिषदेकडून मा. आयुक्त शिक्षण कार्यालयास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Maha Teacher Recruitment

http://www.mscepune.in/

डाउनलोड करा

शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर

  • जाहिरात देण्याचा कालावधी - १५/०८/२०२३ ते ३१/०८/२०२३
  • उमेदवारांना जाहिरातीनुसार जिल्हा परिषदांना प्राधान्यक्रम देणे -  ०१/०९/२०२३ ते १५/०९/२०२३
  • मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे दि. १०/१०/२०२३
  • मुलाखतीशिवाय पदभरतीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे - दि. ११/१०/२०२३ ते दि. २१/१०/२०२३
  • पदस्थापनेसाठी समुपदेशनाचे आयोजन जिल्हास्तरावर करणे - दि. २१/१०/२०२३ ते २४/१०/२०२३

राज्यातील रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत कायम - शासन निर्णय येथे डाउनलोड करा

अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post