Pavitra Portal Online Registration : अखेर प्रतीक्षा संपली! राज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती! पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू होणार

Pavitra Portal Online Registration : राज्यातील शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट बातमी, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली शिक्षक भरतीची प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्यातील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल (Pavitra Portal) द्वारे करण्यात येते, राज्यातील जिल्हा परिषदांची शिक्षक बिंदूनामावली अंतिम झाली असून आता पवित्र पोर्टल लवकरच सुरू होणार आहे. पवित्र पोर्टल सुरु होताच उमेदवारांना Pavitra Portal Online Registration करता येणार आहे. या संदर्भातली बातमी सविस्तर वाचा...

$ads={1}

राज्यात 23 हजार शिक्षकांची बंपर भरती!

Pavitra Portal Online Registration

राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया ही मा. न्यायालयाने दिलेल्या स्थगिती मुळे थांबली होती. मात्र ही स्थगिती उठ्ल्यानंतर राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मध्यंतरी जिल्हा परिषदांच्या बिंदूनामावलीचे काम सुरू होते. आता शिक्षक बिंदूनामवलीचे काम अंतिम झाले असून, उर्वरित जिल्हा परिषदांची बिंदू नामावली तात्काळ पाठवण्याचे आदेश राज्याचे शिक्षण आयुक्तांनी संबंधित जिल्हा परिषदांना दिले आहे.

राज्यातील शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 23 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. तसेच बहुतांश जिल्ह्यामध्ये खुल्या प्रवर्गाचे आरक्षण शिल्लक नसल्यामुळे त्याची चौकशी करून कोणत्या आरक्षणांमधून कोणत्या शिक्षकांची नियुक्ती केली गेली याची खातरजमा करून अंतिम आरक्षण टाकले जाणार आहे.

पवित्र पोर्टलवर या तारखेला नोंदणी सुरू होणार

राज्यातील शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल (Pavitra Portal) 5 सप्टेंबर पूर्वी सुरू होणार असून, भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये  शिक्षक भरतीची संधी मिळणार आहे. यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांना पवित्र पोर्टल वर (Pavitra Portal Online Registration) प्रोफाइल तयार करावी लागेल, ही नोंदणी पवित्र पोर्टल सुरु झाल्यानंतर उमेदवारांना करता येईल, तसेच उमेदवारांना जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार शिक्षक पदांसाठी  नेमणूक मिळणार आहे.

तसेच राज्यातील खासगी अनुदानित संस्थांची रिक्तपदांची जाहिरात ‘पवित्र पोर्टल’ वर अपलोड केल्यानंतर एका जागेसाठी 3 उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे.


Previous Post Next Post