BMC Stenographer Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिकेत 226 पदांची मोठी भरती, पगार 81 हजार रुपये, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख...

BMC Stenographer Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी- नि-मराठी) Stenographer या संवर्गातील एकूण 226 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी तब्बल 81 हजार रुपयापर्यंत पगार मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख दिनांक 4 सप्टेंबर आहे. तेव्हा नक्कीच तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता.

$ads={1}

मुंबई महानगरपालिकेत 226 पदांची मोठी भरती

BMC Stenographer Recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/for prospects/Recruitment / Chief Personal Officer या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची जाहिरात दि. 15 ऑगस्ट 2023 ते दि. 4 सप्टेंबर 2023 या कालावधीकरीता संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. 

  • पदाचे नाव -कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म) (वर्ग-क) 
  • वेतनश्रेणी (सुधारित) M15 (Pay Matrix ) रु.25,500/- ते रु.81,100/- धिक अनुज्ञेय भत्ते
  • भरावयाच्या रिक्त पदांची संख्या - 226

कनिष्ठ लघुलेखक (BMC Stenographer) आवश्यक पात्रता

  1. उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / विज्ञान / वाणिज्य विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  3. उमेदवार 100 गुणांची मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा (उच्चस्तर / निम्नस्तर) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण असणे, तसेच 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  4. उमेदवार खालीलप्रमाणे टंकलेखन व लघुलेखनाच्या किमान / विहित गतीचे शासनाचे प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे.
  5. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि., मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. , इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. 
  6. उमेदवाराजवळ MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराजवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास त्याने/तीने शासनाने विहित केलेली 'एम.एस.सी.आय.टी' ही परीक्षा नेमणूकीच्या दिनांकापासून 2 वर्षांच्या आत उत्तीर्ण होऊन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल.
BMC Stenographer Recruitment

कनिष्ठ लघुलेखक पदासाठी ऑनलाईन अर्ज येथे करा - BMC Stenographer Online Application

सदर पदासाठी आवश्यक ती अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून दि. 15.08.2023 ते दि. 04.09.2023 पर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हे https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay 23 / या लिंकवरुन सादर करावेत.

हे ही वाचा - 10 वी ते पदवीधरांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात सरळ सेवा भरती 

संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छूक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या लिंकवर भेट देऊन, परिपत्रकासोबत जोडलेल्या (HOW TO APPLY) मधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पध्दतीने, विहीत वेळेत सादर करावा. 

अत्यंत महत्वाचे -  उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित पात्रता, अटीची पूर्तता करीत असून, सदर पदाकरिता ते पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे सद्या वापरात असेल असा चालू असणारा ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र Admit Card आणि इतर माहिती उमेदवाराच्या ई-मेलवर देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी चालू राहणे आवश्यक आहे.

आरोग्य विभाग मेगा भरती जाहिरात (ऑनलाईन अर्ज) डायरेक्ट लिंक येथे क्लिक करा

उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अजार्ची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ सकाळी 09.00 ते सायंकाळी 06.00 यावेळेत कॉलसेंटर भ्रमणध्वनी क्रमांक - 1800222366/18001034566 तसेच IBPS या संस्थेच्या संकेतस्थळावर 'IBPS Candidate Grievance Redressal System' ही लिंक उपलब्ध आहे.

$ads={2}

कनिष्ठ लघुलेखक पदासाठी संपूर्ण जाहिरात PDF येथे डाउनलोड करा
कनिष्ठ लघुलेखक पदासाठी ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
अधिकृत वेबसाईट - https://portal.mcgm.gov.in/

सरकारी नोकरी जाहिराती : MIDC मध्ये 802 जागांसाठी जम्बो भरती - 10 वी ते पदवीधरांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात सरळ सेवा भरती

अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.


Previous Post Next Post