Maharashtra Gov In Recruitment 2023 : 10 वी ते पदवीधरांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात सरळ सेवा भरती

Maharashtra Gov In Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून, या सरळसेवा भरती मध्ये तब्बल विविध २१ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तेव्हा तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर नक्कीच या संधीचा लाभ घेऊ शकता. सविस्तर जाहिरात पाहूया..

$ads={1}

महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागात नोकरीची संधी

Maharashtra Gov In Recruitment 2023

राज्यातील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सरळसेवा भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. यासंदर्भात सविस्तर जाहिरात यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक १५ ऑगस्ट २०२३ ते ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

विविध ३९ पदांसाठी कमीत कमी ६३,२०० ते १,२२,८०० रुपयांपर्यंत पगार असणार आहे. नोकरीचे ठिकाण हे राज्यात ज्या ठिकाणी रिक्त जागा असणार आहे तिथे असणार आहे. 

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : दिनांक ०५ सप्टेंबर २०२३

पदाचे नाव 

  1. सहाय्यक अधिक्षक (गट-क)
  2. कनिष्ठ अभियंता (गट-क)
  3. जतन सहायक (गट-क)
  4. तंत्र सहायक (गट-क)
  5. मार्गदर्शक व्याख्याता (गट- क)
  6. उप आवेक्षक (गट-क)
  7. छायाचित्रचालक (गट-क)
  8. अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित)
  9. फार्शीज्ञात संकलक (गट- क)
  10. रसायनशास्त्रज्ञ (गट-क)
  11. संशोधन सहाय्यक (गट- क)
  12. संकलक (गट-क)
  13. सहाय्यक छायाचित्रकार (गट-क)
  14. ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क)
  15. अभिलेख परिचर (गट-क)
  16. तंत्रज्ञ मदतनीस (गट-क)
  17. अधिक्षक (गट-ब अराजपत्रित)
  18. सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य)
  19. सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित)
  20. सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका)
  21. टिप्पणी सहायक (गट-क)

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज वाचा - सरकारी कर्मचारी बातम्या

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया ही IBPS कंपनी द्वारे ऑनलाईन परीक्षा (Computer Based online examination) घेण्यात येणार असून, प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

ऑनलाईन परीक्षेची तारीख संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सदर पदांकरिता इच्छुक व पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक १० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकणार आहे.

$ads={2}

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात येथे डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट - https://mahaarchaeology.in/
ऑनलाईन अर्ज येथे करा - डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post