Mahajyoti Registration : IBPS PO, LIC AAO परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण आणि दरमहा 6000 रुपये मिळणार!

IBPS PO LIC AAO Mahajyoti Registration : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर या‎ संस्थेमार्फत यंदा Institute of Banking Personnel Selection (IBPS) Probationary Officer (PO) तसेच Life Insurance Corporation of India (LIC) तर्फे Assistant Administrative Officer (AAO) या पदासाठी महाज्योतीमार्फत नागपूर व छत्रपती संभाजी नगर या‎ दोन शहरामध्ये एकूण 600 विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोबतच विद्यावेतन देखील मिळणार आहे. तेव्हा इच्छुक व गरजू उमेदवार या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घेऊ शकता, सविस्तर पाहूया...

$ads={1}

IBPS PO, LIC AAO परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

IBPS PO LIC AAO Mahajyoti Registration

महाज्योती योजनेचे स्वरुप

महाज्योती मार्फत IBPS, PO, LIC, AAO या पदाच्या पूर्वतयारीसाठी सन 2024 या परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणाचा कालावधी हा एकूण 6 महिन्याचा असतो.

यादरम्यान मोफत प्रशिक्षणाबरोबर दरमहा 6000 रुपये विद्यावेतन दिले जाते. यामध्ये छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे 300 आणि नागपूर येथे 300 उमेदवारांना हे महाज्योती मार्फत प्रशिक्षण मोफत  देण्यात येते.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. जातीचा प्रमाणपत्र
  3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
  4. 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  5. पदवी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
  6. पदव्युत्तर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदव्युत्तरच्या शेवटचा वर्षाचे प्रमाणपत्र
  7. दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला
  8. बॅकेचे खाते आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न असावे.

आरक्षण

  • इतर मागासवर्ग, विमुक्त जाती - भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 30% जागा महिलांसाठी आरक्षित आहे.
  • अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
  • दिव्यांगासाठी 4 % जागा आरक्षित आहे.

वयोमर्यादा - 20 ते 33

निवड पद्धत

अर्ज करण्याचा अंतिम दि.21/09/2023 आहे. विहित नमुन्यामध्ये कागदपत्रासहित अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची छाननी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते.

प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास रुजु होतील त्या दिवसापासून त्यांना रु.6000/- प्रति महिना या दराने विद्यावेतन लागू होते. 

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर संस्थेकडुन IBPS PO, LIC AAO परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता OBC/VJNT/SBC या संवर्गातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सुचना फलक/Notice Board मध्ये उपलब्ध 'Application for IBPS PO, LIC AAO Pre Exam Training 2023-24' यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने दिनांक - 21/09/2023 पर्यंत अर्ज करण्याबाबत कळविण्यात आले आहे. [महाज्योतीकडून मोफत टॅब]

ऑनलाईन अर्ज येथे करा - डायरेक्ट लिंक
संपूर्ण जाहिरात PDF येथे पहा

HDFC बँक देत आहे 75,000 रुपयांची शिष्यवृत्ती! लगेच येथे करा अर्ज
आरोग्य विभाग मेगा भरती जाहिरात (ऑनलाईन अर्ज) डायरेक्ट लिंक येथे क्लिक करा

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post