Retirement Age Pension : निवृत्तीनंतर नसेल पैशांची चिंता! फक्त 210 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळेल 5000 रूपये पेन्शनची हमी

Retirement Age Pension : प्रत्येक नोकरदार वर्ग हा आपल्या कमाई मधून थोडीफार तरी बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला देखील तुमच्या निवृत्तीच्या वृद्धपकाळात पेन्शन लाभ पाहिजे असेल, तर यासाठी एक चांगला पर्याय म्हणजे केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना (APY) ही सरकारची खास योजना आहे. सविस्तर पाहूया..

$ads={1}

निवृत्तीनंतर नसेल पैशांची चिंता! फक्त 210 रुपयांच्या गुंतवणुकीत मिळेल 5000 रूपये पेन्शनची हमी

Retirement Age Pension

निवृत्तीनंतर पेन्शन लाभ देण्याची केंद्र सरकारची एक खास योजना आहे. प्रत्येक नोकरदार वर्ग किंवा इतर व्यक्ती हा आपल्या पुढील भविष्यातील आर्थिक गोष्टींचे नियोजन करत असतो.

वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळायला हवी, यासाठी कोणता स्वस्त आणि मस्त प्लान असू शकतो? यासंदर्भात केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना हा एक उत्तम पर्याय आहे.

या योजनेमध्ये तुम्ही महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करून, निवृत्तीनंतर म्हणजेच तुमच्या वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये गुंतवणूक करून 1 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत महिन्याला पेन्शन मिळू शकते. 

अटल पेंशन योजना काय आहे?

अटल पेन्शन योजना (APY) दिनांक 9 मे 2015 रोजी सुरु करण्यात आली. देशातील नागरिकांसाठी, विशेषतः गरीब, वंचित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली.

तुम्हाला जर निवृत्तीनंतर महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल, तर तुम्हाला अटल पेन्शन योजनेमध्ये 210 रुपये गुंतवावे लागतील तेव्हा तुम्हाला महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल. अटल पेन्शन योजनेमध्ये महिन्याला 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 असे वेगवेगळे प्लॅन आहेत.

APY पेन्शन योजना ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व बँक खातेधारकांसाठी आहे.जर तुम्ही अटल पेन्शन योजनेत 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास, गुंतवणुकीनुसार तुम्हाला पुढीलप्रमाणे पेन्शन मिळेल. 

  1. महिन्याला 210 रु जमा केल्यास तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षांपासून दरमहा 5000 रु. पेन्शन मिळेल.
  2. महिन्याला 168 रु जमा केल्यास तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षांपासून दरमहा 4000 रु. पेन्शन मिळेल.
  3. महिन्याला 126 रु जमा केल्यास तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षांपासून दरमहा 3000 रु. पेन्शन मिळेल.
  4. महिन्याला 84 रु जमा केल्यास तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षांपासून दरमहा 2000 रु. पेन्शन मिळेल.
  5. दरमहा 42 रु जमा केल्यास तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षांपासून महिन्याला 1000 रु. पेन्शन मिळेल. 

विशेष म्हणजे या APY पेन्शन योजनेत जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल, एवढा तुमचा फायदा होईल आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही गुंतवणुकीची रक्कम कमी किंवा जास्त करू शकता. तसेच या योजनेत जर 60 वर्षापूर्वीच गुंतवणूकदाराचे निधन झाल्यास त्यांचे वारसदार APY अटल पेन्शन योजना पुढे सुरू ठेवू शकते.

फक्त 436 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 2 लाखांचा विमा, जाणून घ्या

अटल पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कोठे करायचा?

निवृत्तीनंतर पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजने साठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असल्यास तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचे अकाउंट असणे आवश्यक आहे, किंवा पोस्ट ऑफिस मध्ये तुमचे खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अटल पेन्शन योजनेचा प्लॅन घेऊ शकता. [माहिती पत्रक]

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय येथे पहा

$ads={2}

अधिक माहितीसाठी - https://www.india.gov.in/spotlight/atal-pension-yojana

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post