Talathi Bharti Cut off Result 2023 : तलाठी भरती परीक्षेचा यंदाचा कट ऑफ निकाल किती पर्यंत जाईल? जाणून घ्या...

Talathi Bharti Cut off 2023 : महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय सरळसेवा भरती म्हणजे तलाठी भरती होय. सध्या राज्यामध्ये तलाठी भरती परीक्षा सुरू आहे, बऱ्याच जिल्ह्यातील उमेदवारांनी तलाठी भरतीची परीक्षा दिलेली आहे, आता या परीक्षेचा निकाल कट ऑफ (Talathi Bharti Cut off ) किती पर्यंत लागेल? याबद्दल प्रत्येक उमेदवारांना उत्सुकता लागली आहे. यंदा तलाठी भरतीच्या तब्बल 4 हजार 644 जागांसाठी ही मेगा भरती होत आहे. आजच्या या आर्टिकल मधून आपण यापूर्वीच्या तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेचा कट ऑफ (Cut off) किती पर्यंत लागला होता, आणि त्यानुसार Talathi Bharti Cut off Result 2023 यावर्षीचा कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो? याबद्दलची माहिती पाहणार आहोत.

$ads={1}

महाराष्ट्र तलाठी भरती जिल्हानिहाय निकाल 2023 | Maharashtra Talathi Recruitment District Wise Cut off Result 2023

Talathi Bharti Cut off 2023

तलाठी भरती 2023 तपशील

  • पद - तलाठी 
  • विभाग - महसूल व वन विभाग
  • एकूण पदे - 4644
  • पगार (वेतनश्रेणी) - S-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
  • परीक्षेचा कालावधी - सदर परिक्षा दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि.१४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असणार आहे. सदर परिक्षा ३ सत्रात आयोजित करणेत आलेली आहे.

महसूल विभागातील गट- क (Group-C) संवर्गातील तलाठी भरती सन 2023 ही TCS कंपनीमार्फत घेण्यात येत आहे. सदरच्या तलाठी परीक्षेकरीता राज्यभरातून 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहे. आता यानुसार प्रत्यक्ष किती उमेदवार परीक्षा देतात? ते पहावे लागणार आहे.

तलाठी भरतीसाठी असलेल्या रिक्त जागा आणि प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी मिळवलेले गुण, महिला, पुरुष, दिव्यांग आणि इतर राखीव गट, माजी सैनिक, खेळाडू त्यासोबतच जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या राखीव जागा या काही घटकांचा कट ऑफ ठरवताना विचार केला जातो. यासाठी आपण यापूर्वी म्हणजेच सन 2019 मध्ये झालेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल Talathi Bharti Cut off 2019 मध्ये किती लागला होता ते पाहूया.

महाराष्ट्र तलाठी भरती जिल्हानिहाय निकाल 2019 | Maharashtra Talathi Recruitment District Wise Cut off Result 2019

राज्यातील तलाठी भरती यापूर्वी झालेल्या सन 2019 मध्ये तलाठी भरती परीक्षेचा कट ऑफ हा खालीलप्रमाणे लागलेला दिसून आलेला आहे. संवर्गनिहाय (Category) नुसार कट ऑफ पुढीलप्रमाणे 

संवर्ग (Category) - तलाठी भरती परीक्षा कट ऑफ (Maharashtra Talathi Cut Off)

  • General - 172-180
  • OBC - 170-176
  • EWS - 168-176
  • SC - 160-168
  • ST - 150-162
  • VJ - 160-168
  • NT - 160-168

यापूर्वीच्या तलाठी भरती परीक्षेचा कट ऑफ चे विश्लेषण केले असता, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले असून, मधल्या कालावधीत वाढलेली स्पर्धा आणि उमेदवारांची तयारी यामुळे या परीक्षेसाठी स्पर्धा तर दिसून येतच आहे. त्यामुळे आता तलाठी भरती 2023 परीक्षेचा कट ऑफ हा 2019 च्या परीक्षेच्याच दरम्यान असण्याची शक्यता आहे. मात्र हे जिल्हानिहाय वेगवेगळे असणार आहे. त्यामुळे आता अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यापूर्वी तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला होता, त्या जिल्ह्याची निवड यादी Talathi Bharti Cut off Result पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हानिहाय निकाल कट ऑफ पाहण्यासाठी डायरेक्ट सर्व जिल्ह्यांचा निकाल एकाच ठिकाणी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

$ads={2}

मोठी अपडेट ! तलाठी भरती परीक्षेच्या तारखेबाबत जाहीर सूचना! सविस्तर वाचा

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय येथे पहा

      Previous Post Next Post