7th Pay Commission Latest News : राज्यातील खाजगी शाळा मधील कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत असुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येत होते, आता या कर्मचार्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली असून , सदर कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून सातवा वेतन आयोगाचा लाभ 3 मार्च 2023 च्या महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र (7th Pay Gazette PDF) नुसार लागू करण्यात आलेला आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू - 7th Pay Commission News
राज्यातील सरकारी (State Government Employees) कर्मचाऱ्यांना यापूर्वीच सातव्या वेतन आयोगाचा लाभ लागू करण्यात आलेला आहे , परंतु राज्यातील खाजगी शाळा मधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अद्याप पर्यंत लागू करण्यात आलेला नव्हता , अशा कर्मचाऱ्यांना आता 2016 पासून सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्यात आलेला आहे.
कोणाला मिळेल लाभ?
यामध्ये प्राथमिक शिक्षक ,प्रशिक्षित शिक्षक ,अप्रशिक्षित शिक्षक, तसेच राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , माध्यमिक शाळा मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर विशेष शिक्षक शारीरिक प्रशिक्षण निदेशक इ. कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.
खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ
सुधारित वेतनश्रेणी शासन राजपत्र - 7th Pay Gazette PDF
या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार सातवा वेतन आयोगामध्ये नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे . या संदर्भातील सुधारित वेतनश्रेणी लागू करणेबाबतचा सविस्तर शासन राजपत्र डाऊनलोड करा.
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी शासन निर्णय
मुख्यमंत्र्यांसोबत यशस्वी चर्चा - जुनी पेन्शन योजना