आनंदाची बातमी! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ

Contract Employees Salary Hike: राज्यातील ग्रामविकास विभागातंर्गत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील ((MSRLM)) कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ऑगस्ट २०२३ व सप्टेंबर २०२३ मधील मानधनवाढीच्या फरकाची रक्कम माहे सप्टेंबर २०२३ पेड इन ऑक्टोबर २०२३ च्या मानधनासोबत कंत्राटी कर्मचा-यांना अदा करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा..

$ads={1}

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ

Contract Employees Salary Hike

दि. २४ जुलै २०२३ रोजी मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या एकूण मानधनामध्ये २०% मानधनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात (MSRLM) राज्यस्तरापासून ते क्लस्टरस्तरापर्यत स्वतंत्र, समर्पित व संवेदनशील यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत अभियानांतर्गत एकूण २७४१ कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या मासिक मानधनामध्ये २० टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या इतरही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनामार्फत दीन दयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. सदरील अभियानाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभागातंर्गत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना करण्यात आलेली आहे. 

सद्यस्थितीत सदरील अभियान ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यांमध्ये इंटेन्सिव्ह पद्धतीने राबविण्यात येत आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापासून ते ग्रामस्तरापर्यंत स्वतंत्र, संवेदनशील व समर्पित यंत्रणा निर्माण केलेली आहे.

बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयान्वये अभियानांतर्गत नियुक्त व सद्यस्थितीत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी तसेच ugh CSC eGovernance Services India Limited, New Delhi या बाह्यस्थ संस्थेमार्फत सद्यस्थितीत अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांना देय असलेल्या एकूण मानधनाच्या २० मानधनवाढ दि. १ ऑगस्ट २०२३ पासून लागु करण्यात आली आहे. 

ऑगस्ट २०२३ व सप्टेंबर २०२३ मधील मानधनवाढीच्या फरकाची रक्कम माहे सप्टेंबर २०२३ पेड इन ऑक्टोबर २०२३ च्या मानधनासोबत कंत्राटी कर्मचा-यांना अदा करण्यात येणार आहे. {आदेश पहा}

पवित्र पोर्टलमधील भरती प्रक्रियेत मोठा बदल; केंद्रांतर्गत साधन व्यक्तींची निवड करण्याचे निकष पहा..

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! सेवेत नियमित आदेश जारी
दिवाळीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट!

Previous Post Next Post