Pavitra Portal 2023: पवित्र पोर्टलमधील भरती प्रक्रियेत बदल; केंद्रांतर्गत साधन व्यक्तींची निवड करण्याचे निकष पहा..

Pavitra Portal Shikshak Bharti 2023: शिक्षण सेवकाची भरती 'शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी' यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी पारदर्शक पध्दती विहीत करण्यात आली आहे.  दरम्यानच्या काळात, पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपध्दतीमध्ये बदल, सुधारणा करणे व काही तरतूदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने, नव्याने तरतूदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सविस्तर वाचा..

$ads={1}

पवित्र पोर्टलमधील भरती प्रक्रियेत बदल!

Pavitra Portal Shikshak Bharti 2023

तसेच सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यानुषंगाने इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनाच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे. जेणेकरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये चालू करण्यात आलेल्या परंतु विद्यार्थ्यांच्या उपस्थिती अभावी बंद पडण्याची शक्यता असलेल्या मराठी व सेमी इंग्रजी शाळा निरंतर सुरु राहतील.

शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय! महत्वाचे परिपत्रक

यास्तव केंद्रांतर्गत असणाऱ्या शिक्षकांचे इंग्रजीमधून अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित करण्याकरीता केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या सर्व बाबींचा विचार करता अभियोग्यता धारक व्यक्तीने निवडीकरीता करावयाची शिफारस, केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरीता केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करुन त्यांचे निवडीचे निकष निश्चित करणे, तसेच दोन विषयाच्या कार्यभाराबाबत अर्हता निश्चित करणे व अर्धवेळ शिक्षकांची पवित्र प्रणालीमार्फत निवड करणेबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक (नोव्हेंबर) सुट्टी यादी पहा

पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्हता तसेच इंग्रजी विषयातून अध्यापनाकरीता केंद्रस्तरावर साधन व्यक्तीची निवड व निकष याअनुषंगाने खालीलप्रमाणे तरतूदी सुधारित करण्यास व नव्याने समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय दिनांक १०.११.२०२२ मधील अ. क्र.५ येथील विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील या तरतूदी ऐवजी, खालील तरतूद करण्यात आली आहे.

विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पुर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येत आहे.

उच्च माध्यमिक (इ ११ वी ते इ १२ वी) या विभागाकडील दोन विषयाचा मान्य कार्यभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युतर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. सदर पदे पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात येतील.

उच्च माध्यमिक (इ ११ वी ते इ १२ वी) या गटातील संच मान्यतेत मूळ मंजूर पैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदे (तासिका तत्वावरील वगळून) पवित्र या प्रणालीमार्फत पद भरती करण्यात येईल.

केंद्रांतर्गत साधन व्यक्तींची निवड करण्याचे निकष

जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळास्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकविण्याकरीता खालील निकषांनुसार शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र शाळांतर्गत शाळांसाठी साधन व्यक्ती म्हणून काम करेल. सदरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदांमधुन होईल. सदरची निवड करताना खालील निकष, प्राधान्यक्रम विचारात घेण्यात येणार आहे.

$ads={2}

  1. पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार (शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण )
  2. पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.
  3. इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.
  4. इ. १० वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.
  5. पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार

वरील निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांना साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एक परीक्षा घ्यावी व यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. यासंदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी या प्रक्रियेचा आराखडा निश्चित करुन या योजनेची अंमलबजावणी करावी. असे नमूद करण्यात आले आहे. {सविस्तर शासन निर्णय येथे पहा}

शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय! महत्वाचे परिपत्रक

आनंदाची बातमी! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ
दिवाळीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट!

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post