दिव्यांग (CWSN) विद्यार्थ्यासंदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित

विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन व मूल्यमापनामध्ये गरजेनुसार अध्ययनार्थी दृष्टीकोनातून अध्ययनशैलीनुसार अध्यापन व अनुकूलित (Adaptive) मूल्यांकन पध्दतीचा उपयोग करण्यासंदर्भात शासन स्तरावरुन समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्ययन शैलीनुसार सुलभ अध्ययन, अध्यापन व अनुकूलित (Adaptive) मूल्यांकन पध्दतीचा व शैक्षणिक सवलतींचा उपयोग करण्याबाबत दि. १६ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये तरतूद करण्यात आली आहे. आता यामध्ये टाईप-१ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना सोयी सवलती देण्याबाबत नवीन शासन निर्णय 26 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

दिव्यांग (CWSN) विद्यार्थ्यासंदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित

divyang shasan nirnay

आता, टाईप-१ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस अध्यक्ष, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचे अर्धशासकीय पत्र दि.२३.०३.२०२३ अन्वये करण्यात आली आहे. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे शासन पूरकपत्र निर्गमित करण्यात आले आहे.

आता, टाईप-१ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना प्रपत्र “अ” मुद्दा क्र.२२ मध्ये २२.१८ ते २२.२४ अंतर्गत खालील प्रमाणे अधिकच्या सोयी सुविधा अनुज्ञेय असतील. टाईप १ मधुमेह असणाऱ्या विद्यार्थ्याकरिता आरोग्यविषयक अतिरिक्त सोयी सुविधा.

२२.१८ टाईप- १ मधुमेह (Diabetes mellitus type) असणारे विद्यार्थी ज्यांना शाळेच्या सकाळच्या किंवा दुपारच्या सत्रामध्ये खाद्यपदार्थांची (Snaks) आवश्यकता भासल्यास अशा विद्यार्थ्यांना त्यांनी बाळगलेले खाद्यपदार्थ (Snaks) शाळेच्या वर्गखोलीत खाण्याची परवानगी वर्गशिक्षकांनी द्यावी.

२२.१९ मधुमेह असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी खेळामध्ये भाग घेण्यास परवानगी दिली असेल अशा विद्यार्थ्यांना तशा आशयाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर शालेय खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी परवानगी द्यावी.

टाईप १ मधुमेह असणाऱ्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धापरीक्षा आणि शाळेच्या इतर परीक्षेच्यावेळी देय असणाऱ्या अतिरिक्त सोयी सुविधा.

दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंची महत्त्वाची घोषणा

२२.२० टाईप- १ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना मधुमेहाच्या गोळ्या (Diabetes Tablet) सोबत नेण्याची परवानगी द्यावी.

२२.२१ अशा विद्यार्थ्यांनी सोबत आणलेले औषधे/फळे, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, बिस्किटे /शेंगदाणे/सुकामेवा इत्यादी परीक्षेच्या हॉलमध्ये शिक्षकांकडे ठेवण्यात याव्यात, आवश्यक असल्यास या बाबी अशा विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान द्याव्यात.

'समावेशित शिक्षण' (दिव्यांग) शासन निर्णय येथे पहा

२२.२२ शाळेतील कर्मचाऱ्यांनी टाईप १ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना ग्लुकोमीटर आणि ग्लुकोज चाचणी पट्ट्या सोबत घेऊन जाण्याची परवानगी द्यावी. ग्लुकोमीटर आणि ग्लुकोज चाचणी पट्ट्या परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये निरीक्षक/ शिक्षकांकडे ठेवण्यात येतील.

२२. २३ टाईप १ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना रक्तातील साखरेची चाचणी करण्याची आणि आवश्यकतेनुसार वर नमूद केलेल्या पदार्थांचे सेवन करण्याची परवानगी द्यावी.

२२.२४ CGM (Continuous Glucose Monitoring), FGM (Flash Glucose Monitoring) आणि / किंवा इन्सुलिन पंप वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान ही उपकरणे ठेवण्याची परवानगी द्यावी. जर Glucose Monitoring साठी स्मार्ट फोन वापरण्यात येत असेल तर तो स्मार्ट फोन शिक्षक/निरीक्षक यांच्याकडे ठेवण्यात यावा.

Previous Post Next Post