Shikshak Bharti 2023 : शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल! मुलाखतीसह विकल्पासाठी आता प्रमाण बदलणार; सुधारित शासन निर्णय पहा..

Shikshak Bharti 2023 : शिक्षक भरती प्रक्रीया अधिक पारदर्शक होण्यासाठी शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, आता शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलव्दारे मुलाखतीसह विकल्पासाठी उमेदवारांची शिफारस करण्यासाठीचे प्रमाण १:१० ऐवजी १:३ असे सुधारीत करणेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहीत केलेल्या एकूण ३० गुणासंदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure) तयार करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच आता राज्यामध्ये दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून शिक्षक भरतीच्या जाहिराती देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

$ads={1}

शिक्षक भरतीत येणार पारदर्शकता

Shikshak Bharti 2023

खाजगी शैक्षणिक संस्थाच्या शाळांमधील शिक्षणसेवकांची रिक्त पदे भरताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी, यास्तव अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर भरती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मा.न्यायालयांच्या आदेशानुसार शासनाने  घेतला आला.

शिक्षक भरती संदर्भात दाखल जनहित याचिका प्रकरणी मा. न्यायालयाने दिलेले निर्देश विचारात घेता शिक्षक भरती प्रक्रीयेतील गैरव्यवहार टाळणे व गुणवत्तेवर आधारीत निवड प्रक्रीयेत पारदर्शकता आणणे यासंदर्भात उपाययोजना करण्यामध्ये १:१० प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करुन देण्याची तरतूद विहीत करण्यात आल्यामुळे अजूनही अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. 

यासाठी मा. न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन खाजगी संस्थाचे शिक्षक निवडीचे व नियुक्तीचे अधिकार अबाधित ठेवून शिक्षक भरती प्रक्रीया अधिक पारदर्शक होण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी शासनाने पुढील निर्णय घेतले आहे.

जिल्हा परिषद भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर
पवित्र पोर्टलमधील भरती प्रक्रियेत बदल

मुलाखतीसह विकल्पासाठी प्रमाण आता १:१० ऐवजी १:३ असे असणार

१) मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्षकीय जागेकरीता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह शासन निर्णय, दिनांक ७.२.२०१९ अन्वये विहीत केलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राधान्य क्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदूनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची त्या व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

२) संबंधित शैक्षणिक संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे एकूण ३० गुणांसंदर्भात या उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करावयाचा असून त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण व विषय विचारात घेऊन उच्चतम गुणप्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करण्याबाबत कळविण्यात आले आहे. 

३) त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहीत केलेल्या एकूण ३० गुणासंदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure) तयार करण्याबाबत कळविण्यात आले आहे. [सविस्तर शासन निर्णय पहा]

$ads={2}

जिल्हा परिषद भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर
पवित्र पोर्टलमधील भरती प्रक्रियेत बदल

Previous Post Next Post