दिवाळीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट! वाढीव पगार व फरकासह निधी वर्ग..

Contract Employees Salary Increase: राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, मागील काही दिवसापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित कर्मचारी आंदोलन, मोर्चे काढत आहे, आता राज्यातील समग्र शिक्षा (सर्व शिक्षा अभियान) अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांना सरकारने दिवाळीपूर्वी मोठी भेट देत सन २०२२ २३ व सन २०२३ २४ या दोन वर्षांच्या एकत्रित मानधनासाठी फरकासह निधी वर्ग करण्यात आला आहे.

दिवाळीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट! वाढीव पगार व फरकासह निधी वर्ग

Contract Employees Salary Increase

सम्रग शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमातील विशेष शिक्षकांना (प्राथमिक स्तर) सन २०१७ १८ या आर्थिक वर्षात रु.२१,५००/- प्रतिमाह इतके मानधन मंजूर करण्यात आले होते. तथापि, समग्र शिक्षाच्या सुधारित आराखड्यानुसार या विशेष शिक्षकांचे मानधन सन २०१८ १९ या शैक्षणिक वर्षापासून रु.२०,०००/- प्रतिमाह च्या मर्यादेत निश्चित करण्यात आलेले होते. त्यानुसार, सन २०१८ १९ या शैक्षणिक वर्षापासून विशेष शिक्षकांना रु. १५००/- प्रतिमाह इतके मानधन कमी मिळत होते. यास्तव सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून रु.१५००/- प्रतिमाह इतकी फरकाची रक्कम राज्य निधीमधून देण्याचा व यासाठी एकूण रु. ३५०.२८ लक्ष इतका निधी दरवर्षी राज्य हिश्याच्या प्रमाणाबाहेर उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव मा. मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात आला असता. मा. मंत्रीमंडळाने त्यास मान्यता दिली आहे.

केंद्रस्तरावर साधनव्यक्तीची निवड होणार

समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२२ २३ या कालावधीसाठी समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या मानधनातील फरकाची रक्कम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी केली होती.

मात्र आर्थिक वर्ष २०२२ २३ संपल्याने पुढील कार्यवाही हाऊ शकली नाही. सद्यस्थितीत सन २०२२ २३ व सन २०२३ २४ या दोन वर्षांच्या एकत्रित मानधनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी पत्रान्वये केली आहे.

MPSC मार्फत गट क संवर्गातील तब्बल 7,510 जागांसाठी महाभरती, सविस्तर तपशील पहा.

राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी केलेल्या विनंतीनुसार, समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमातील एकूण १,७७५ विशेष शिक्षकांच्या सन २०२२ २३ व २०२३ २४ या दोन वर्षांच्या रु. ६,३९,००,०००/- इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. {शासन निर्णय पहा}

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! सेवेत नियमित आदेश जारी
आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन 2035 सरकारची मोठी घोषणा

Previous Post Next Post