Talathi Bharti Exam Result 2023: तलाठी भरती परीक्षा चा निकाल कधी जाहीर होणार पहा, जिल्हानिहाय निकाल येथे पहा

Talathi Bharti Exam Result Answer Key 2023: महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागा अंतर्गत घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षा विविध टप्प्यांमध्ये पार पडली आहे. या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता. अखेर परीक्षा संपल्यानंतर आता परिक्षार्थी या परीक्षेच्या निकालची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच उमेदवारांना सदर परीक्षेची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत आलेली आहे, त्यानुसार यंदा तलाठी परीक्षा निकाल कट ऑफ किती लागेल? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. चला तर मग जाणून घेऊया..

$ads={1}

तलाठी भरती परीक्षा चा निकाल कधी जाहीर होणार पहा

Talathi Bharti Exam Result Answer Key 2023

राज्यातील महसूल विभागातील तलाठी (Group-C) संवर्गातील सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात दि 26 जून 2023 रोजी प्रसिध्द करणेत आली होती. सदर तलाठी पदभरती करिता 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत एकुण 57 सत्रामध्ये  आयोजित करण्यात आलेली आहे. आता उमेदवारांना सदर परीक्षेची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत आलेली आहे.

तलाठी (गट-क) सवंर्गाची परिक्षा 2023 ही राज्यातील एकुण 36 जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली असून, उमेदवारांची संख्या विचारात घेऊन सदर परिक्षा वेगवेगळया सत्रामध्ये घेण्यात आली आहे. सदर प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळया असल्यामुळे, भिन्न प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळीचे समीकरण (Normalization) करण्यात येईल व त्यासाठी खाली नमूद केलेल्या (Mean Standard Deviation Method) या पध्दतीचा अवलंब करण्यात येईल. असे कळविण्यात आले होते.

Talathi Bharti Exam Result Answer Key 2023

त्यानुसार उमेदवारांना उपलब्ध करुन देणेत आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने (प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इ. बाबत आक्षेप, हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते 8 ऑक्टोंबर 2023 रोजी पर्यंत TCS कंपनीकडून लिंक खुली करुन देण्यातआलेली आहे. सादर केलेल्या आक्षेप / हरकती बाबत TCS चे समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. असे महाभूमीच्या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

Talathi Bharti Exam Result Answer Key 2023

तलाठी भरती परीक्षा चा निकाल कधी जाहीर होणार पहा

राज्यभरात पार पडलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज केलेल्या 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांपैकी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. तलाठी भरती परीक्षा दिलेले उमेदवार महाराष्ट्र तलाठी भरती 2023 च्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. Talathi Bharti Exam Result 2023 निकाल लवकरच अधिकृत वेबसाइट mahabhumi.gov.in वर उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे.  उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी 8 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यांनतर म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तलाठी भरती परीक्षा निकाल 2023 जाहीर होणे अपेक्षित आहे.

रिलायन्स फाऊंडेशनकडून 2 लाखांची शिष्यवृत्ती अर्ज येथे करा

तलाठी भरती परीक्षा जिल्हानिहाय निकाल येथे पहा

तलाठी भरती परीक्षेचा निकाल 2023 जाहीर होताच अधिकृत वेबसाइट mahabhumi.gov.in यावर पाहता येणार आहे.  यापूर्वीच्या तलाठी भरती परीक्षेचा कट ऑफ चे विश्लेषण केले असता, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले असून, मधल्या कालावधीत वाढलेली स्पर्धा आणि उमेदवारांची तयारी यामुळे या परीक्षेसाठी स्पर्धा तर दिसून येतच आहे. त्यामुळे आता तलाठी भरती 2023 परीक्षेचा कट ऑफ हा 2019 च्या परीक्षेच्याच दरम्यान असण्याची शक्यता आहे. मात्र हे जिल्हानिहाय वेगवेगळे असणार आहे. त्यामुळे आता अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यापूर्वी तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला होता, त्या जिल्ह्याची निवड यादी Talathi Bharti Cut off Result पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हानिहाय निकाल कट ऑफ पाहण्यासाठी डायरेक्ट सर्व जिल्ह्यांचा निकाल एकाच ठिकाणी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

$ads={2}

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post