MPSC मार्फत गट क संवर्गातील तब्बल 7,510 जागांसाठी महाभरती, सविस्तर तपशील पहा..

MPSC Group C Recruitment 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट क संवर्गातील तब्बल 7 हजार 510  पदांसाठी पदवीधर व आवश्यक पात्रता पूर्ण असलेल्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. सविस्तर तपशील पाहूया..

MPSC मार्फत गट क संवर्गातील तब्बल 7,510 जागांसाठी महाभरती

Mpsc Group C Recruitment 2023

प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण  7510 पदांचा सविस्तर तपशील

  • दुय्यम निरीक्षक (Sub-Inspector) राज्य उत्पादन शुल्क विभाग - 6
  • तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) - 1
  • कर सहाय्यक (Tax Assistant)  - 468
  • लिपिक टंकलेखक (Clerk Typist)  - 7035
  • एकुण - 7510
$ads={1}

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणा-या उमेदवाराकडून आयोगाच्या https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी - दिनांक १० ऑक्टोबर २०१३  ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३
  • ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - ३१ ऑक्टोबर २०२३ 
  • भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक -  २ नोव्हेंबर २०२३
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - ३ नोव्हेंबर २०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये)

आवश्यक पात्रता

  • जाहिरातीतील सर्व पदासाठी उमेदवार हे पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसेच कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक पदांकरीता मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महत्वाचे -  दिनांक २० जानेवारी, २०२३ नुसार आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून भरावयाच्या गट-क संवर्गाच्या दिनांक १ सप्टेंबर २०२३ व  १२ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यातयेणार आहे.

जिल्हा परिषद भरती परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक पहा
केंद्रांतर्गत साधन व्यक्तींची निवड करण्याचे निकष पहा..

$ads={2}

ऑनलाईन अर्ज येथे करा - https://mpsconline.gov.in/candidate
अधिकृत वेबसाईट - https://mpsc.gov.in/

Previous Post Next Post