Employees News: राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सामान्य प्रशासन विभागाचे नवीन परिपत्रक जारी...

State Government Employees Latest News: राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयामध्ये येत असतात. त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहीत होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे. परंतु शासकीय कार्यालयांत हजर असलेले संबंधित अधिकारी, कर्मचारी हे दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नाहीत. ओळखपत्राबात एखाद्या नागरिकाने विचारणा केली असता शासकीय अधिकारी, कर्मचारी ओळखपत्र दाखवीत नाहीत. आता या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने एक महत्वाचे परिपत्रक काढले आहे, सविस्तर वाचा..

$ads={1}

राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सामान्य प्रशासन विभागाचे नवीन परिपत्रक जारी

State Government Employees Latest News

राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे, जेणेकरून याबाबत नागरिकांची तक्रार प्राप्त होणार नाही असे यापूर्वीच दिनांक ७ मे २०१४ च्या शासन परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले आहे. तसेच सदर सूचनांची अमंलबजावणी करण्यात कुचराई करणाच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध वरिष्ठ अधिका-यांनी योग्य ती कारवाई करावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. 

परंतु सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता या बाबी विचारात घेता 10 ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकान्वये दिनांक ७ मे २०१४ च्या शासन परिपत्रकातील सूचनांचा पुनरुच्चार करण्यात येत असल्याचे म्हंटले आहे.

महिला व मुलींसाठी जबरदस्त योजना पहा

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रवेशाच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या ओळखपत्राची काटेकोरपणे तपासणी करून ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवावीत. संबंधित प्रशासकीय विभागांनी ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कारवाई करून त्याचा मासिक अहवाल विहित विवरणपत्रात पाठवावीत असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे. {परिपत्रक पहा}

$ads={2}

आनंदाची बातमी! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ
दिवाळीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट!

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post