जळगाव महानगरपालिकेमध्ये मोठी भरती; स्वयंमुल्याकनाद्वारे होणार थेट निवड

Jalgaon Municipal Corporation Recruitment 2023: जळगाव शहर महानगरपालिकेतील विविध संवर्गातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, सदर भरती ही ऑफलाईन होणार आहे, निवड प्रक्रिया ही स्वयंमुल्यांकन पद्धतीने म्हणजेच शैक्षणिक अहर्ता मध्ये प्राप्त गुण व मुलाखत याद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे, गुणांकन पद्धती व गुण या लेखामध्ये माहिती दिलेली आहे, तसेच अर्जाचा नमुना, पदांची संख्या, आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता, अनुभव, नियम, अटी व शर्ती इ. जळगांव शहर महानगरपालिकेच्या www.jemc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तुम्ही या लेखाच्या शेवटी दिलेल्या डायरेक्ट लिंकवरून जाहिरात डाउनलोड करू शकता.

$ads={1}

जळगाव महानगरपालिकेमध्ये मोठी भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील

Jalgaon Municipal Corporation Recruitment 2023

जळगाव महानगरपालिका भरती एकूण पदनिहाय जागा

पदाचे नाव - एकूण जागा
  1. कनिष्ठ अभियंता (बांधकाम) - 10
  2. कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा) - 03
  3. कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 04
  4. रचना सहाय्यक - 04
  5. आरेखक - 02
  6. अग्निशमन फायरमन - 15
  7. विजतंत्री - 06
  8. वायरमन - 12
  9. आरोग्य निरीक्षक - 10
  10. टायपिस्ट / संगणक चालक - 20
  11. एकूण - 86

जळगाव महानगरपालिका भरती विविध पदांचा तपशील

Jalgaon Municipal Corporation Recruitment 2023

Jalgaon Municipal Corporation Recruitment 2023

उपरोक्त पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्रांच्या सांक्षाकित केलेल्या छायांकित प्रतीसह ऑफलाईन (Offline) पध्दतीने समक्ष सादर करावयाचे आहे.

स्वयंमुल्यांकन गुणतालिका

  1. किमान शैक्षणिक अर्हता - ५० गुण
  2. अनुभव - १० गुण
  3. स्थानिक रहिवाशी - १० गुण
  4. अतिरिक्त शैक्षणिक अर्हता - १० गुण
  5. मौखिक चाचणी - २० गुण
  6. एकूण - १०० गुण
सदरचे तपशील सविस्तर जाहिरात पहावी, लिंक खाली दिलेली आहे.

वयोमर्यादा :- किमान वयोमर्यादा(सर्व प्रवर्ग) - १८ वर्ष
कमाल वयोमर्यादा :- खुला प्रवर्ग ३८ वर्ष
सर्व राखीव प्रवर्ग ४३ वर्ष (इमाव, अ.ज., अ.जा., भज, विज, विमाप्र )

विहित अहर्ता धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट देवून जाहिरातीतील तपशील विचारात घेवून विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जळगाव शहर महानगरपालिका, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल टॉवर प्रशासकिय इमारत, आस्थापना विभाग १० वा मजला 'अ' विंग येथे विहीत मुदतीत समक्ष सादर करावेत.

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :- आस्थापना विभाग, प्रशासकिय इमारत १० वा मजला सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक जळगांव ४२५००१

सदरची पदे तात्पुरत्या स्वरुपात करारपध्दतीने ६ महिन्याच्या हंगामी कालावधीसाठी (१७९ दिवसांकरीता) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे.

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी

जळगाव महानगरपालिका भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - महत्वाच्या तारखा

दिनांक ०३/१०/२०२३ ते दिनांक २०/१०/२०२३ (सुट्टीचे दिवस वगळून)
वेळ :- सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत

टिप :- दिनांक २०/१०/२०२३ रोजी संध्याकाळी ५.३० नंतर कोणत्याही परिस्थीतीत कुणाचेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत. भरती प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने असल्याने ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अधिकृत वेबसाईट - www.jcmc.gov.in

$ads={2}


Previous Post Next Post