Talathi Bharti 2023 : तलाठी भरती संदर्भात महत्वाची अपडेट, नवीन शासन निर्णय जारी

Talathi Bharti 2023 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी यंदा राज्यात एकूण 75,000 रिक्त पदे भरण्यात येत आहे. याअनुषंगाने महसूल व वन विभागाच्या अखत्यारितील तलाठी (गट-क) संवर्गाची पदभरती राबविण्यासंदर्भात अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. 14 सप्टेंबर रोजी तलाठी पदभरती संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. तसेच  आता तलाठी भरती परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तलाठी भरती निकाल 2023 जाहीर होण्याची उत्सुकता लागली असून, Talathi Bharti Cut Off 2023 किती पर्यंत जाईल याबाबत आतुरता आहे, मागील निकालानुसार याबाबत या लेखाच्या शेवटी राज्यातील 36 जिल्ह्यांचा निकाल डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता.

$ads={1}

तलाठी भरती संदर्भात महत्वाची अपडेट, नवीन शासन निर्णय जारी

Talathi Bharti 2023

तलाठी पद भरती - २०२३ करीता तलाठी पदभरतीबाबतची जाहिरात दि.२६.जून २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर तलाठी भरती प्रक्रियेसाठी विभागस्तरावर व जिल्हास्तरावर परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहन खर्चासाठी, परीक्षा केंद्रावरील सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, पोलिस बंदोबस्तासाठी, नियुक्त कर्मचारी यांचे मानधन इ. करीता जिल्हयांना आगाऊ रक्कम अदा करण्यात आली आहे. त्याकरीता ३६ जिल्हयांना प्रत्येकी ५ लक्ष प्रमाणे कार्यालयीन खर्च करण्यास्तव पूरक मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. याबाबतचा शासन निर्णय 14 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

तलाठी भरती परीक्षेचा यंदाचा कट ऑफ निकाल किती पर्यंत जाईल?

राज्यातील तलाठी भरती यापूर्वी झालेल्या 2019 मध्ये तलाठी भरती परीक्षेचा कट ऑफ हा खालीलप्रमाणे लागलेला दिसून आलेला आहे. संवर्गनिहाय (Category) नुसार कट ऑफ पुढीलप्रमाणे 

संवर्ग (Category) - तलाठी भरती परीक्षा कट ऑफ (Maharashtra Talathi Cut Off)

  • General - 172-180
  • OBC - 170-176
  • EWS - 168-176
  • SC - 160-168
  • ST - 150-162
  • VJ - 160-168
  • NT - 160-168

यापूर्वीच्या तलाठी भरती परीक्षेचा कट ऑफ चे विश्लेषण केले असता, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले असून, मधल्या कालावधीत वाढलेली स्पर्धा आणि उमेदवारांची तयारी यामुळे या परीक्षेसाठी स्पर्धा तर दिसून येतच आहे. त्यामुळे आता तलाठी भरती 2023 परीक्षेचा कट ऑफ हा 2019 च्या परीक्षेच्याच दरम्यान असण्याची शक्यता आहे. मात्र हे जिल्हानिहाय वेगवेगळे असणार आहे. त्यामुळे आता अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यापूर्वी तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला होता, त्या जिल्ह्याची निवड यादी Talathi Bharti Cut off Result पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हानिहाय निकाल कट ऑफ पाहण्यासाठी डायरेक्ट सर्व जिल्ह्यांचा निकाल एकाच ठिकाणी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

$ads={2}

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय येथे पहा

Previous Post Next Post