मोठी बातमी! कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन

Equal Pay For Equal Work : राज्यातील बाह्ययंत्रणेद्वारे कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला असून, समान काम समान वेतन (Equal Pay For Equal Work) या तत्वावर नियमित वेतनश्रेणीमध्ये किमान वेतन देण्याबाबत मा न्यायालयाने आदेशित केले आहे. त्यानुसार राज्य सरकारने बाह्ययंत्रणेद्वारे कार्यरत कंत्राटी (Contract Employees) कर्मचाऱ्यांना किमान वेतन अनुदान मंजूर करून अदा करण्यात आले आहे. सविस्तर वाचा..

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मा उच्च न्यायालयाचा दिलासा

Equal Pay For Equal Work

बीड, लातूर, यवतमाळ, नागपूर, कोल्हापूर व बुलढाणा या 6 जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त कंत्राटी वाहनचालकांची सेवा नियमित करण्याबाबत आणि समान पदाच्या वेतनश्रेणीच्या किमान टप्प्यावर वेतन अदा करण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यानुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका मध्ये मा. न्यायालयाने कंत्राटी वाहनचालकांना समान पदाच्या नियमित वेतनश्रेणीच्या किमान टप्प्याएवढी मोबदला रक्कम (मानधन) देण्याबाबत सरकारला आदेशित केले आहे. 

त्यानुषंगाने या 6 जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त कंत्राटी वाहनचालकांना समान पदाच्या नियमित वेतनश्रेणीच्या किमान टप्याइतकी मोबदला रक्कम (मानधन) मंजूर करण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त कंत्राटी वाहनचालकांनी नियमित वेतनश्रेणीच्या किमान टप्प्यावर वेतन अदा करण्याबाबत या 6 जिल्हयातील 162 कंत्राटी वाहनचालकांना न्याय मिळाला आहे, या कर्मचाऱ्यांना देय असलेले मानधन व (याचिकेच्या दिनांकापासून) पूर्वी अदा केलेल्या मानधनातील फरकाच्या रकमेसहित मंजूर करण्यात आली आहे.

राज्यातील कंत्राटी संसाधन व्यक्तीच्या मानधनात भरीव वाढ!

जिल्हा परिषदेकडील कंत्राटी वाहन चालक यांना मा. उच्च न्यायालयाने समान काम समान दाम या तत्वावर वाहन चालक या पदाच्या नियमित वेतनश्रेणीमध्ये किमान वेतन मिळणेबाबत दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे, तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. {शासन निर्णय पहा)

हे ही वाचा : कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी, शासनाकडे प्रस्ताव सादरअखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू - सरकारी नोकरी महा भरती जाहिराती येथे पहा - बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन शासन निर्णय

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post