Mahajyoti Police Bharti 2023 : गुड न्यूज! महाज्योतीतर्फे 16,863 विद्यार्थ्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण मिळणार; निवड यादी जाहीर

Mahajyoti Police Bharti 2023 : महाज्योती या संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण-2023 (Police Recruitment Exam Pre-Training-2023) योजनेद्वारे विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते, यामध्ये एकूण-19196 अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार कागदपत्रे तपासणी करुन पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण-2023 साठी निवड परीक्षेकरीता पात्र एकूण - 16863 व अपात्र एकूण- 2333 ठरलेले आहेत. तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत, लिंक खाली दिलेली आहे.

$ads={1}

महाज्योती पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण यादी जाहीर

Mahajyoti Police Bharti 2023

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर संस्थेकडुन पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता OBC/VJNT/SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यातआले होते. त्यानुसार निवड परीक्षेकरीता पात्र व अपात्र विद्यार्थ्यांची यादी दि.08 सप्टेंबर 2023 रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

$ads={2}

महाज्योती पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण-2023 पात्र यादी पहा
महाज्योती पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण-2023 अपात्र यादी पहा

 IBPS PO, LIC AAO परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण आणि दरमहा 6000 रुपये मिळणार!

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर या‎ संस्थेमार्फत यंदा Institute of Banking Personnel Selection (IBPS) Probationary Officer (PO) तसेच Life Insurance Corporation of India (LIC) तर्फे Assistant Administrative Officer (AAO) या पदासाठी महाज्योतीमार्फत नागपूर व छत्रपती संभाजी नगर या‎ दोन शहरामध्ये एकूण 600 विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोबतच विद्यावेतन देखील मिळणार आहे. तेव्हा इच्छुक व गरजू उमेदवार या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घेऊ शकता, ऑनलाईन अर्ज येथे करा.

Previous Post Next Post