Contract Employees : कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी, शासनाकडे प्रस्ताव सादर

Contract Employees Regularization : महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य स्तरापासून ते गावपातळी पर्यंत विविध पदांवर अधिकारी, कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. एकीकडे नियमित कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांचे कामाचे स्वरूप एकाच प्रकारचे असताना, हे कंत्राटी कर्मचारी गेल्या 12 ते 15 वर्षापासून अल्प मानधनावर काम करत आहे, या कर्मचाऱ्यांकडून शासकीय सेवेत नियमित करण्याबाबत वारंवार मागणी होत आहे, मागील काही दिवसांमध्ये शासनाने कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केले आहे, आता कंत्राटी क्षयरोग नियंत्रण कर्मचा-यांच्या सेवा नियमित करणेबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, सविस्तर वाचा..

$ads={1}

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी, शासनाकडे प्रस्ताव सादर

Contract Employees Regularization

राज्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत मा.आयुक्त (आरोग्य सेवा) तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 26 मे 2023 रोजी सभा आयोजित करण्यात आलेली होती.

सदर सभेमध्ये कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा पत्र मसूदा सादर करण्या विषयी संबंधित संघटनेस सूचित करण्यात आले होते. त्यानुसार राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा नियमित करणेबाबाबतचा प्रस्ताव संघटनेने 27 जुलै 2023 सबंधित कार्यालयास सादर करण्यात आला आहे. आता याबाबत 4 सप्टेंबर 2023 रोजी पुढील कार्यवाहीसाठी सदर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आता यावर शासन काय निर्णय घेते? हे पाहावे लागेल. परिपत्रक पहा

$ads={2}

मोठी बातमी! कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन
अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू
Previous Post Next Post