Govt Jobs Age Limit : सरकारी नोकरीसाठी 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी, वय वाढवल्याने जास्तीत जास्त उमेदवारांना फायदा!

Govt Jobs Age Limit 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट, यावर्षी राज्यांमध्ये विविध विभागाअंतर्गत रिक्त असणाऱ्या  75 हजार सरळसेवा कोट्यातील पदांसाठी महा भरती होत आहे, आता राज्यातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहेमहाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांने जाहिरात प्रसिद्ध केली असून, याबाबत एक महत्त्वाचे शुद्धीपत्रक 9 सप्टेंबर 2023 रोजी काढले आहे, यामुळे उमेदवारांना एक चांगली संधी मिळाली आहे.

सरकारी नोकरीसाठी 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी

Govt Jobs Age Limit 2023

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांने 125 जागांसाठी जाहिरात काढली असून, यामध्ये पुणे विभागात 48, कोकण विभागात 28, नागपूर विभागात 19, नाशिक विभागात 9, संभाजीनगर (औरंगाबाद) विभागात 11 आणि अमरावती विभागात 10 पदांची भरती करण्यात येत आहे.

दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी काढलेल्या शुद्धीपत्रकानुसार आता उमेदवारांचे वय 40 वर्ष करण्यात आले आहे, म्हणजेच 2 वर्ष वाढवण्यात आले आहे, त्यामुळे आता याचा जास्तीत जास्त उमेदवारांना फायदा होईल. सविस्तर जाहिरात पुढे पहा.
dtp maharashtra recruitment
  • पदाचे नाव  - शिपाई (गट-ड) 
  • एकूण जागा - 125
  • पगार (वेतनश्रेणी) - S1 15000-47600 रुपये, अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते

रिक्त पदांचा तपशील : शिपाई (गट-ड) - एकूण जागा 125 , यामध्ये पुणे विभागात 48, कोकण विभागात 28, नागपूर विभागात 19, नाशिक विभागात 9, संभाजीनगर (औरंगाबाद) विभागात 11 आणि अमरावती विभागात 10 पदांची भरती करण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता - माध्यमिक शालांत (SSC) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

वेतनश्रेणी : वेतनस्तर S1 15000-47600 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप : सदर परीक्षेसाठी मराठी : 25 प्रश्न - 50 गुण, इंग्रजी : 25 प्रश्न - 50 गुण, सामान्यज्ञान : 25 प्रश्न - 50 गुण, बौद्धिक चाचणी : 25 प्रश्न - 50 गुण असे एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.

Previous Post Next Post