DTP Maharashtra Recruitment 2023 : इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी! जाहिरात येथे डाऊनलोड करा

DTP Maharashtra Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी, महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, संभाजीनगर (औरंगाबाद) , अमरावती विभागामध्ये मोठी भरतीची जाहिरात निघाली असून, यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण उमदेवार अर्ज करू शकणार आहे? जागांचा तपशील, पात्रता, ऑनलाईन अर्ज कोठे करायचा? जाहिरात सविस्तर वाचा..

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!

$ads={1}

dtp maharashtra recruitment 2023

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, संभाजीनगर (औरंगाबाद) , अमरावती विभागात तब्बल 125 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यामध्ये शिपाई (Group-D) संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती बाबत महत्वाची अपडेट!

आवश्यक शैक्षणिक पात्रता : इयत्ता दहावी माध्यमिक शालांत परिक्षा (SSC) उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणा-या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे व 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी / खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी / भूकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 25 वर्षे शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील.

परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप : सदर परीक्षेसाठी मराठी : 25 प्रश्न - 50 गुण, इंग्रजी : 25 प्रश्न - 50 गुण, सामान्यज्ञान : 25 प्रश्न - 50 गुण, बौद्धिक चाचणी : 25 प्रश्न - 50 गुण असे एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.

रिक्त पदांचा तपशील : शिपाई (गट-ड) - एकूण जागा 125 , यामध्ये पुणे विभागात 48, कोकण विभागात 28, नागपूर विभागात 19, नाशिक विभागात 9, संभाजीनगर (औरंगाबाद) विभागात 11 आणि अमरावती विभागात 10 पदांची भरती करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद भरती परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक, हॉल तिकीट जिल्हानिहाय येथे पहा

वेतनश्रेणी : वेतनस्तर एस ०१ रु.१५००० - ४७६०० अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

महत्वाचे - ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://dtp.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि.20/09/2023 रोजी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

$ads={2}

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post