Talathi Bharti Answer Key 2023 : तलाठी भरती महत्वाची अपडेट! उत्तरतालिका (Answer Key) बाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर

Talathi Bharti Answer Key 2023: महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात दि २६ जून२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर तलाठी पदभरती करिता दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत एकुण ५७ सत्रामध्ये परीक्षा घेणेत आलेली आहे. आता उमेदवारांना सदर परीक्षेची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत येणार आहे. याबाबत महाभूमी कडून एक महत्वाचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. सविस्तर वाचा..

$ads={1}

तलाठी भरती महत्वाची अपडेट! उत्तरतालिका (Answer Key) बाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर

Talathi Bharti Answer Key

तलाठी (गट-क) सवंर्गाची परिक्षा २०२३ ही राज्यातील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली असून, उमेदवारांची संख्या विचारात घेऊन सदर परिक्षा वेगवेगळया सत्रामध्ये घेण्यात आली आहे. सदर प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळया असल्यामुळे, भिन्न प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळीचे समीकरण (Normalization) करण्यात येईल व त्यासाठी खाली नमूद केलेल्या (Mean Standard Deviation Method) या पध्दतीचा अवलंब करण्यात येईल. असे कळविण्यात आले होते.

Talathi Bharti Answer Key


त्यानुसार आता दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांचे परीक्षेचे सत्राची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत येणार आहे. उमेदवारांना उपलब्ध करुन देणेत आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) चे अनुषंगाने (प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इ. बाबत आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि. २८ सप्टेंबर २०२३ ते ८ ऑक्टोंबर २०२३ रोजी या कालावधीत TCS कंपनीकडून लिंक खुली करुन देण्यात येणार आहे. सादर केलेल्या आक्षेप / हरकती बाबत TCS चे समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदर प्रश्नाबाबत गुण देण्याबाबत धोरण निश्चित करुन देणेत येईल. TCS कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप / हरकती करिता रक्कम रु. १००/- इतको फो आकारणेत येईल. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करणेत येईल. आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

Talathi Bharti Answer Key

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

Talathi Bharti Answer Key | उत्तरतालिका अशी करा डाउनलोड

Talathi Bharti Answer Key (उत्तरतालिका) पाहण्यासाठी खालील स्टेप Follow करा

  1. प्रथम महाभूमीच्या https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या वेबसाइटला भेट द्या.
  2. आता 'तलाठी भरती परीक्षा 2023' या टॅबवर क्लिक करा.
  3. त्यानंतर https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html या लॉगीन पेजवर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका.
  4. Talathi Bharti Answer Key उत्तरतालिका डाउनलोड करा.
$ads={2}

Talathi Bharti Answer Key

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post