Eid-e-Milad Holiday 2023: मोठी बातमी! ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी बदलली; या तारखेला सुट्टी जाहीर

Eid-e-Milad Holiday 2023: राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार, दि.२८ सप्टेंबर, २०२३ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात, यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

$ads={1}

ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी बदलली; या तारखेला सुट्टी जाहीर

यावर्षी गुरुवार, दि.२८ सप्टेंबर, २०२३ रोजी हिंदू धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणूक काढण्यात येते व नंतर तिथे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदू बांधवांची मोठी गर्दी जमा होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार, दि.२८ सप्टेंबर, २०२३ ऐवजी शुक्रवार, दि.२९ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

Eid-e-Milad holiday

Eid-e-Milad holiday

Previous Post Next Post