Contract Employees: राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; अखेर सुधारित शासन निर्णय जारी...

MNRLM Contract Employees Salary Increase: उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सद्यस्थितीत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात तसेच अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरता निधीमध्ये वाढ करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापासून ते केंद्रस्तरापर्यत स्वतंत्र, समर्पित व संवेदनशील यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. सदर अभियान राज्यातील ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. समुदाय संसाधन व्यक्ती व कार्यरत प्रेरिका यांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय 26 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात वाढ

NRLM Contract Employees Salary Increase

राज्यातील ग्रामीण भागातील गरीबी निर्मुलनासाठी केंद्र शासनामार्फ़त दीन दयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (DAY-NRLM) राबविण्यात येत असून, यासाठी राज्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Livelihoods Mission) अर्थात 'उमेद' ची सन २०११ मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. 

समुदायस्तरीय संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरिका (Internal Community Resource Person-ICRP) व विविध प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्ती (Community Resource Person -CRP) कार्यरत आहेत. सदर कार्यरत प्रेरिकांच्या (Internal Community Resource Person-ICRP) मुल्यमापन करून अ, ब व क वर्गवारीनुसार दरमहा मानधन अदा करण्यात येते.

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कायम होणार?

समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी/Business Development support Person (BDSP) मानधन वाढ, यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पध्दतीने मुल्यमापन करुन कमाल रु.६०००/- दरमहा मानधन अदा करण्यात येईल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर अभियानाचा कालावधी मार्च २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे माहे मार्च, २०२६ पर्यंत सदरील मानधन अभियानामार्फत अदा करण्यात येईल व त्यानंतर समुदाय संसाधन व्यक्तींचे मानधन संबंधित समुदायस्तरीय संस्था त्यांच्या स्व:उत्पन्नातून अदा करण्याबाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर सरकारचा मोठा निर्णय!
NRLM Contract Employees Salary Increase

NRLM Contract Employees Salary Increase

कर्मचारी अपडेट - कंत्राटी कर्मचारी बातम्या - सरकारी कर्मचारी बातम्या

स्वयं सहाय्यता गटांना अतिरिक्त फ़िरता निधीमध्ये वाढ

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहाय्यता गटांना सद्य:स्थितीत अ, ब व क वर्गवारीत श्रेणीकरण करुन अधिकतम रु.१५,०००/- फिरता निधी (RF) वितरीत करण्यात येतो. यामध्ये वाढ करण्यात येत असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयं सहाय्यता गटांची वर्गवारी करुन अ वर्गवारी प्राप्त होणा-या स्वयं सहाय्यता गटांना रु.३०,०००/- देय राहील व वर्गवारी ब व क मध्ये येणा-या स्वयं सहाय्यता गटांना प्रचलित पध्दतीने फिरता निधी अनुज्ञेय करण्यात आला आहे.

यापूर्वी ज्या स्वयं सहाय्यता गटांना त्यांच्या वर्गवारीनुसार अभियानामार्फ़त फिरता निधी अदा केलेला आहे, अशा गटांना रु.१५०००/- अतिरिक्त फिरता निधी देय राहील. तसेच ज्या स्वयं सहाय्यता गटांना फिरता निधी अद्याप दिलेला नाही, परंतु जे स्वयं सहाय्यता गट फिरता निधी मिळण्यासाठी पात्र आहेत, अशा स्वयं सहाय्यता गटांना 26 सप्टेंबर पासून फिरता निधी त्यांच्या वर्गवारीनुसार अभियानातील प्रचलित पध्दतीप्रमाणे अनुज्ञेय करण्यात आला आहे.

शासन निर्णय पहा

$ads={2}

मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय वेळापत्रक

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post