सफाई कामगारांच्या प्रश्नांवर सरकारचा मोठा निर्णय! हक्क आणि अधिकार मिळणार; वाचा सविस्तर

Safai Karmchari Latest Update: महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता अधिक वेगाने काम करेल व त्याद्वारे सफाई कामगारांचे हक्क व अधिकार त्यांना मिळतील असे प्रतिप्रादन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

$ads={1}

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर सरकारचा मोठा निर्णय!

Safai Karmchari Latest Update

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई विद्यापीठ व जनआधार सेवा फाऊंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सफाई कामगार उत्थान परिषद मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा शुभसंदेश वाचण्यात आला. शुभसंदेशात श्री.आठवले यांनी, केंद्र शासन सफाई कामगारांचे जीवनमान उंचावण्याकरिता ‘नमस्ते’ योजनेद्वारे सर्वतोपरी मदत करील, अशी ग्वाही दिली.

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वतीने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजना, अनुकंपा वारसांना नोकरी देणे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रित कंपनीच्या योजना, ‘नमस्ते’ मोहीम, हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन करणे या अधिनियमानुसार कामगारांना आधुनिक यंत्रसामुग्री पुरविण्याचे काम सफाई कर्मचारी आयोगामार्फत होऊ शकते. तसेच सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कायम होणार?

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले, सफाई कामगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणे, सुनियोजित प्रशिक्षण देऊन सर्वतोपरी त्यांच्या आरोग्याचे व जीवनाचे संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी, माजी अप्पर मुख्य सचिव ए. के. जैन, अखिल भारतीय वाल्मिकी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. रेखा बहनवाल, सफाई मजदूर कॉग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री धनराज बिरदा, सल्लागार ऍड. गीरेंद्रनाथ, जनआधार सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी गटचर्चा सत्र घेण्यात आले. यामध्ये प्रशासकीय सत्र, संशोधक विद्यार्थी सत्र व आरोग्यदूत सफाई मित्र सत्र घेण्यात आले. यामध्ये झालेल्या चर्चा व ठरावाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना निवेदन देण्यात आले.

EPFO चे नवीन अपडेट जाणून नक्कीच आनंदी व्हाल! वाचा संपूर्ण माहिती;

दुपारच्या सत्रात कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशम, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी.वावा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सुभाष पारधी, आमदार सुनील कांबळे, बाटू विद्यापीठाचे कुलगुरू   डॉ. के. व्ही. काळे , सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी विचार मांडून मार्गदर्शन केले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्यासाठी बेमुदत आंदोलन

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशम म्हणाले, केंद्र शासन सफाई कामगारांच्या उत्थानासाठी कटिबध्द असून कायदा व वित्तीय सहाय्याव्दारे सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यात येतील. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे म्हणाले, सफाई कामगारांना समाजात सन्मानाने वावरता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील असून केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ योजनेमार्फत आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणे व योजनेव्दारे सफाई कामगारांना सहाय्य करण्यात येईल.

यावेळी जनआधार सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी जनआधार सेवा फाऊंडेशन संस्था अनेक वर्षांपासून सफाई कामगारांचे कल्याण व उत्थानासाठी काम करत असून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात महाप्रितचे संचालक विजयकुमार काळम-पाटील व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अन्य अधिकारी तसेच राज्यातून मोठ्या संख्येने सफाई कामगार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चाबुकस्वार यांनी केले. तर संजय कांबळे यांनी आभार मानले.

$ads={2}

EPFO चे नवीन अपडेट जाणून नक्कीच आनंदी व्हाल! वाचा संपूर्ण माहिती;

कर्मचारी अपडेट - कंत्राटी कर्मचारी बातम्या - सरकारी कर्मचारी बातम्या

जिल्हा परिषद भरती परीक्षा Hall Ticket डाउनलोड डायरेक्ट लिंक
तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post