Maharashtra State Government Declared Public Holidays 2023 : महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या 2023 PDF यादी 'येथे' डाउनलोड करा

Maharashtra State Government Declared Public Holidays 2023 : सन २०२३ या वर्षातील अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिने बाकी आहे, तुम्ही जर Holidays Plan करत असाल तर नक्कीच सार्वजनिक सुट्ट्या कधी? व किती? मिळणार आहे, यानुसार तुम्ही तुमच्या ट्रिपचे नियोजन करू शकता, इथे तुम्हाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या सन २०२३ मधील सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादी दिलेली आहे. या वर्षात तब्बल १२८ सुट्ट्या मिळणार आहे. बऱ्याचदा सण/उत्सव जवळ आले की, त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी आहे का? असा सर्वसामान्य प्रश्न आपल्याला पडतो, आता तुम्हाला संपूर्ण वर्षातील अधिकृत सुट्ट्यांची यादी मिळणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला बस, रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी किंवा इतर नियोजन करण्यासाठी नक्कीच कामी येणार आहे.

$ads={1}

सार्वजनिक सुट्ट्या महाराष्ट्र शासन | Maharashtra State Government Declared Public Holidays 2023

Maharashtra State Government Declared Public Holidays 2023

महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२३ या वर्षातील एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केलेल्या आहे. याबाबतची अधिसूचना यापूर्वीच दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी काढण्यात आली आहे.

सन २०२३ या वर्षात एकूण ५३ रविवार आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्या अशा एकूण ७७ सुट्ट्या आहेत.

ज्या शासकीय कार्यालयांना पाच दिवसाचा आठवडा लागू आहे, अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तब्बल १२७ सुट्ट्या मिळणार आहे. यामध्ये ५३ रविवार, ५० शनिवार (दोन शनिवारच्या सुट्ट्या ह्या सार्वजनिक सुट्यात पकडलेले आहे.), २४ सार्वजनिक सुट्ट्या अशा एकूण १२७ सुट्ट्या आहेत.

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२३, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी २०२३, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी २०२३, होळी (दुसरा दिवस) ७ मार्च २०२३, गुढीपाडवा २२ मार्च २०२३, रामनवमी ३० मार्च २०२३, महावीर जयंती ४ एप्रिल २०२३, गुड फ्रायडे ७ एप्रिल २०२३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२३, महाराष्ट्र दिन १ मे २०२३, बुद्ध पौर्णिमा ५ मे २०२३, बकरी ईद (ईद-उल-झुआ) २८ जून २०२३, मोहरम २९ जुलै २०२३, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३, पारशी नववर्ष दिन १६ ऑगस्ट २०२३, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०२३, ईद-ए-मिलाद २९ सप्टेंबर २०२३, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०२३, दसरा २४ ऑक्टोबर २०२३, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर २०२३, दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर २०२३, भाऊबीज १५ नोव्हेंबर २०२३, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर २०२३, ख्रिसमस २५ डिसेंबर २०२३

राज्यातील कंत्राटी कर्मचारी शासनसेवेत नियमित आदेश पहा
या कर्मचाऱ्यांना मानधन वाढीसह दिवाळी बोनस जाहीर

november 2023 calendar with holidays

या व्यतिरिक्त आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या, तसेच राज्यातील प्रत्येक विभाग निहाय महत्वाचे सण/उत्सव जसे की, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन १७ सप्टेंबर, इतर सुट्ट्या त्या-त्या विभाग निहाय मिळतात. सर्वात महत्वाचे म्हणजे मा. जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील असणाऱ्या स्थानिक सुट्ट्या देखील जाहीर केल्या जातात. त्यामुळे तुम्ही या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार तुमचा Holidays Plan करू शकता.

$ads={2}

महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या 2023 PDF यादी येथे डाउनलोड करा

Previous Post Next Post