आनंदाची बातमी! या कर्मचाऱ्यांना मानधन वाढीसह दिवाळी बोनस जाहीर

राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ, 3 हजार 664  गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200 रुपये मानधन वाढ, आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी 2 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका, संघटनांचे  प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत सांगितले.

$ads={1}

आनंदाची बातमी! या कर्मचाऱ्यांना मानधन वाढीसह दिवाळी बोनस जाहीर

employees-latest-news

राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. सद्यस्थितीत राज्यात 80 हजारावर आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी  आशा सेविकांना 5 हजार रुपये मानधन देण्यात येत होते. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी मानधनात 7 हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. 

आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनस्तरावरूनही  3 हजार रुपये मानधन दिले जाते.  त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता 15 हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

राज्यात 3 हजार 664 गट प्रवर्तक कार्यरत आहेत. यापूर्वी गट प्रवर्तकांना 6 हजार 200 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी  6 हजार 200 रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे.

राज्यातील कंत्राटी कर्मचारी शासनसेवेत नियमित, शासन आदेश पहा  

गट प्रवर्तकांना केंद्रशासनस्तरावरूनही 8 हजार 775 रुपये मानधन मिळत असून,  त्यांना आता 21 हजार 175 रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. या बैठकीत  आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2 हजार रुपये दिवाळी भेटही देणार असल्याची  घोषणा आरोग्य मंत्र्यांनी केली आहे. 

आशा स्वयंसेविकांना मानधनवाढ व दिवाळी भेट देऊन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड केली आहे. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मोठी बातमी! कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय! महत्वाची बैठक संपन्न

बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कंत्राटी भरतीचा तो शासन निर्णय अखेर रद्द! आता नऊ महिन्याच्या आत या कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात येणार


$ads={2}

शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील नवीन अपडेट

राज्यातील कंत्राटी कर्मचारी शासनसेवेत नियमित, शासन आदेश पहा

मोठी बातमी! कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय! महत्वाची बैठक संपन्न

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post