जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनामधील फरक माहितीय का? जाणून घ्या फरक - Old Pension Scheme Vs New Pension Scheme

Old Pension Scheme Vs New Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात देशभरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. बहुतांश राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत असून, काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. तर काही राज्यात नवीन पेन्शन योजनेत बदल करण्याची मागणी होत आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काही दिवसापूर्वी दिल्लीतील रामलीला मैदानावर पेन्शन शंखनाद रॅलीत लाखो कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र अजूनही बऱ्याचदा जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनामधील फरक काय आहे? हेच लक्षात येत नाही, जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेतील फरक जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल अवश्य वाचा..

जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनामधील फरक

old pension scheme vs new pension scheme

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना NPS मध्ये दिलेल्या योगदानाच्या आधारे पेन्शन दिले जाते. तर जुनी पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाते. जुनी पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून कर्मचाऱ्यांना मिळते, तर या दरम्यान नोकरीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे योगदान कर्मचाऱ्यांना द्यावे लागत नाही. मात्र राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 10% आणि सरकारचे 14% असे योगदान त्यांच्या NPS मध्ये जमा होऊन त्यांना पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो. जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यामध्ये रिटर्न निश्चितता, कर लाभ, पात्रता, योगदान, लवचिकता इत्यादीसारख्या अनेक समस्यांचा समावेश आहे.

$ads={2}

old pension scheme vs new pension scheme

 जुनी पेन्शन योजना लागू होणार?

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात नेमलेल्या अभ्यास समितीची मुदत दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी संपली आहे, सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा कधी करणार आहे? यासंदर्भात राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (National Pension System) व जुनी निवृत्तीवेतन योजना (Old Pension Scheme) यांचा तुलनात्मक अभ्यास करत असलेल्या समितीने सविस्तर माहिती सादर करणेबाबत कळविण्यात आले आहे. सविस्तर येथे वाचा..

जिल्हा परिषद भरती परीक्षा Hall Ticket डाउनलोड डायरेक्ट लिंक
तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post