Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना 'या' राज्याने केली लागू, 1 एप्रिल 2023 पासून मिळणार लाभ..

Old Pension Scheme Latest News : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासाठी देशभरातील सरकारी कर्मचारी अग्रेसर भूमिका घेत आहेत, यापूर्वीच 'जुनी पेन्शन योजना' ही राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड व पंजाब या राज्यात NPS नंतर पुन्हा जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अजून एका राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे, हिमाचल प्रदेश सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे, सविस्तर माहिती पाहूया..

राज्यातील 1.36 लाख कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू 

Old Pension Scheme Latest News

हिमाचल प्रदेश सरकारने नुकतेच कर्मचाऱ्यांच्या ,महागाई भत्यात (DA Hike) करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असताना, आता अजून एक मोठा निर्णय HP सरकारने घेतला आहे, हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारने राज्यात जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली आहे. या संदर्भात 17 एप्रिल 2023 रोजी सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

सरकारी अधिसूचनेनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2023 पासून जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्य सरकारच्या 1.36 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. आता ते राष्ट्रीय पेन्शन योजनेचा (NPS) भाग असणार नाहीत. या सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्यापासूनच जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याची खात्री देण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ

OPS जानेवारी महिन्यात मंत्रिमंडळाचा निर्णय

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुकीदरम्यान काँग्रेसने OPS पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार निवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशमध्ये सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आणि आता काँग्रेस सरकारने निवडणूक आश्वासन पूर्ण केले आहे. 13 जानेवारी 2023 रोजी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 17 एप्रिल 2023 रोजी प्रत्यक्षात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

जुनी पेन्शन योजना हिमाचल प्रदेश अधिकृत निर्णय येथे पहा

जुनी पेन्शन योजनेचा या महिन्यापासून मिळणार लाभ

Old Pension Scheme लागू करण्याची अधिसूचना HP राज्य सरकारने नुकतीच जारी करण्यात आली,  अधिसूचनेत असे म्हटले आहे की, मंत्रिमंडळाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयानंतर, NPS नवीन पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे योगदान 1 एप्रिल 2023 पासून बंद करण्यात येणार असून जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे.

संबंधित बातम्या

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

    

Previous Post Next Post