7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्रापाठोपाठ 'या' राज्यानेही वाढवला महागाई भत्ता..

7th Pay Commission DA Increase News : सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात केंद्र सरकारने नुकतीच 7th Pay Commission नुसार महागाई भत्ता 4 टक्के वाढ करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला, आता हिमाचल प्रदेशातील दिनानिमित्त कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला सविस्तर बातमी पाहूया.. 

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात 'या' राज्याने केली वाढ

7th Pay Commission DA Increase

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात सरकारने 38 टक्क्यावरून 42 टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. ज्याचा लाभ 47.58 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना (Pensioners) मिळाला आहे.

हिमाचल प्रदेश दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात 3 टक्के वाढ

Himachal Pradesh कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. आता या राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के DA मिळेल, जो यापूर्वी 31 टक्के होता.

केंद्र सरकार आणि काही राज्यातील सरकाराने 7th Pay Commission नुसार DA मध्ये वाढ केल्यानंतर हिमाचल प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 2.15 लाख कर्मचारी आणि 1.90 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

Previous Post Next Post