RTE Selection : 'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत 94 हजार 700 मुलांच्या कागदपत्रांची तपासणी सुरु, या' जिल्ह्यात सर्वाधिक RTE प्रवेश..

RTE Selection List 2023 24 : महाराष्ट्र राज्यातील 'आरटीई' प्रवेश प्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरु झाली असून दिवसभरात 116 बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहे, RTE Selection List जाहीर केल्यानंतर राज्यातील निवड झालेल्या मुलांच्या पालकांनी Admit Card Download करण्यासाठी एकदमच RTE पोर्टलवर भेट Visit केल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होण्याच्या समस्या पालकांना भेडसावत आहे. लवकरच 'आरटीई' पोर्टल पूर्ववत होऊन पालक Admit Card Download करू शकतील, याबद्दलचे RTE Status Update जाणून घेऊया..

'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत 94 हजार 700 बालकांची निवड

RTE Selection List 2023 24

शिक्षण हक्क कायदा (RTE Act 2009) नुसार राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांना खाजगी शाळेत मोफत प्रवेश देण्याची ही योजना आहे, यावर्षी RTE लॉटरी यादी जाहीर झाली असून त्यामध्ये 94 हजार 700 बालकांची निवड करण्यात आली असून, 81 हजार129 मुलांची प्रतीक्षा यादीत निवड झाली आहे.

'आरटीई'  लॉटरी निवड यादी, प्रतीक्षा यादी व दिव्यांग यादी PDF येथे पहा

'आरटीई' 25 टक्के प्रवेश अंतर्गत राज्यातील 116 बालकांचे प्रवेश निश्चित

'आरटीई' 25 टक्के प्रवेश अंतर्गत लॉटरी च्या निवड यादीतील पालकांना एसएमएस पाठवण्यात आले असून, RTE लॉगीन ला Admit Card म्हणजेच प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, मात्र RTE सर्व्हरच्या समस्येमुळे पोर्टल स्लो होत आहे, त्यामुळे पालकांना लॉगीन करण्यासाठी अडचणी येत आहे. 

मात्र काही पालकांनी रात्री उशिरा व सकाळी लवकर लॉगीन केल्यामुळे प्रवेशपत्र डाउनलोड झाले आहेत, त्यामुळे दिवसभरात जवळपास (RTE Selection 2023 24) साठी 116 RTE चे प्रवेश कागदपत्रे तपासणी करून निश्चित झाले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचे सर्वाधिक म्हणजे 37 तर ठाणे जिल्ह्याचे 33 प्रवेश निश्चित झाले आहे.

'आरटीई'  प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यात प्राप्त

'आरटीई'  25 टक्के प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यात एकूण RTE च्या 935 शाळा असून त्यांतर्गत 15 हजार 596 जागा आहेत, त्यासाठी  77 हजार 531 अर्ज आले होते. यामधून लॉटरी पद्धतीने 15 हजार 501 बालकांची निवड करण्यात आली आहे, आतापर्यंत 37 प्रवेश हे निश्चित झाले आहे.

'आरटीई'  प्रवेशासाठी सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राप्त

'आरटीई'  25 टक्के प्रवेशासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण RTE च्या 49 शाळा असून त्यांतर्गत 287 जागा आहेत, त्यासाठी  फक्त 232 अर्ज आले होते. यामधून लॉटरी पद्धतीने 184  बालकांची निवड करण्यात आली आहे, 

'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पर्यायी वेबसाईट

RTE लॉटरी लिस्ट जाहीर झाल्यानंतर RTE चे मूळ पोर्टल हे तात्पुरते बंद करून, https://student.maharashtra.gov.in/ हे  नवीन RTE पोर्टल सुरु करण्यात आले आहे. 

'आरटीई' 25 टक्के प्रवेश Admit Card 'असे' करा Download 

'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी Admit Card डाउनलोड करण्यासाठी पोर्टल पूर्ववत होण्याची वाट पहावी लागणार आहे, त्यांनतर लॉगीन करून Admit Card सेक्शन मधून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. येथे पहा संपूर्ण माहिती..

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

    


Previous Post Next Post