अखेर ! 'आरटीई' लॉटरी ची 'यादी' पोर्टल वर केली जाहीर, यादीत पहा तुमच्या मुलाचे नाव RTE Lottery List Download

RTE Lottery Result 2023 24 List : राज्यातील पालकांसाठी आनंदाची बातमी, अखेर 'आरटीई' प्रवेशाच्या लॉटरी ची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे, राज्यातील 'आरटीई' अंतर्गत 8 हजार 823 शाळांसाठी राज्यातून 3 लाख 64 हजार 413 अर्ज आले होते, त्यातून लॉटरी काढण्यात आली असून पैकी 94 हजार 700 बालकांची निवड करण्यात आली असून, 81 हजार 129 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. याबद्दलची (RTE Lottery Result 2023 24 List) नुसार सविस्तर माहिती पाहूया..

अखेर 'आरटीई' लॉटरी लिस्ट जाहीर

RTE Lottery Result 2023 24 List

'आरटीई' ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 या वर्षाकरिता लॉटरी द्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी (RTE Lottery Result 2023 24 List) RTE Portal वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तसेच निवड यादीतील प्रवेश पात्र  बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस (SMS) प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस (SMS) वर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.

'आरटीई' चा मॅसेज SMS आला नसेल तर येथे चेक करा

'आरटीई' प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी सुरु

RTE निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी सुरु झाली असून, तालुका/मनपा क्षेत्रातील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. 13 एप्रिल 2023 पासून 8 मे 2023 पर्यंत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा. तसेच आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. 

ज्या बालकांचा प्रवेश निवड यादीत नाव आले असेल, अशा पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. तसेच पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

प्रवेशपत्र (Admit Card) येथे करा डाउनलोड 

'आरटीई' प्रतीक्षा यादीतील बालकांना एसएमएस (SMS) 'या' तारखेला मिळणार

'आरटीई' प्रवेशासाठी पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत ही अंतिम 30 एप्रिल 2023 आहे, त्यांनतर प्रवेश क्षमता विचारात घेऊन, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस (SMS) पाठवले जाणार आहेत. असे चेक करा तुमचा RTE निकाल 

'आरटीई' लॉटरी निकाल लिस्ट जाहीर  | RTE Lottery Result 2023 24 List

'आरटीई' लॉटरी निकाल अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी आणि दिव्यांग निवड आणि प्रतीक्षा यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

 'आरटीई' लॉटरी मूळ निवड यादी (Selection List) येथे पहा

{getButton} $text={Selection List Download} $icon={download}

 'आरटीई' लॉटरी प्रतीक्षा (Waiting List) येथे पहा

{getButton} $text={Waiting List} $icon={download}

दिव्यांग निवड आणि प्रतीक्षा यादी येथे पहा

{getButton} $text={Disability List Download} $icon={download}

महत्वाचे - आरटीई 25% प्रवेशाचे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती चेक करत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ -शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

RTE 25 टक्के प्रवेशसाठी आवश्यक कागदपत्रे 


नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

    

Previous Post Next Post