अवकाशातील ताऱ्याला मिळालं बाबासाहेबांंचं नाव, 132 व्या जयंतीनिमित्त अवकाशातील 'तारा' येथे पहा

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2023 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb  Ambedkar) यांची 14 एप्रिल 2023 रोजी जयंती, यावर्षी 132 व्या जयंतीनिमित्त अवकाशातील ताऱ्याला बाबासाहेबांंचं नाव मिळालं आहे. अवकाशातील तारा (Stars in space) हा मोबाइलवरून देखील पाहता येणार आहे, त्यासाठी अँड्रॉइड व ऍपल युजर्स हा तारा ऍप डाऊनलोड करून पाहू शकतात. किंवा वेब पोर्टल वर देखील पाहता येणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया..

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2023

दिनांक 14 एप्रिल हा दिवस भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्मदिवस हा देशभरामध्ये 'आंबेडकर जयंती' (Ambedkar Jayanti 2023) म्हणून साजरा केला जातो. 

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये ही जयंती होत आहे. यंदा बाबासाहेबांची 132 जयंती देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. 

अवकाशातील ताऱ्याला मिळालं बाबासाहेबांंचं नाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6  डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी 'जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा साहब तेरा नाम रहेगा..!' अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनेला 67 वर्ष पूर्ण झाले असून, या घोषणेला प्रत्यक्षात आणण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी राजू शिंदे यांनी ठरवलं. त्यानुसार त्यांनी पाठपुरावा करून अवकाशातील एका ताऱ्याची Registry केली आहे. 

अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी 'International Star and Space Registry' नावाची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावे दिली जातात. 100 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 9 हजार रुपये फी भरून एक ताऱ्याची रजिस्ट्री केली जाते.

त्या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद व्हावी म्हणून 9 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांनी अर्ज केला होता. त्यावर शिंदे यांना Registry चे प्रमाणपत्र मिळाले आहे. 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवनकार्य येथे पहा

मोबाईलवर वर असा पहा अवकाशातील तारा

बाबासाहेबांंचं नाव मिळालेला अवकाशातील तारा पाहण्यासाठी पुढील स्टेप Follow करा

  • सर्वप्रथम https://space-registry.org या स्पेस रजिस्ट्री वेबसाईट ला भेट द्या
  • त्यानंतर Your Registration Number येथे CX26529US क्रमांक टाका 
  • आता Check Registry Number या Tab वर क्लिक करा
  • आता एक पॉप अप ओपन होईल त्यावर Registry Info दिसेल, त्यानंतर View Star यावर क्लिक करा
  • आता तुम्हाला स्क्रीन वर बाबासाहेबांंचं नाव मिळालेला अवकाशातील तारा पाहायला मिळेल.
अवकाशातील तारा पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांनी जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कार्याचे, विचारांचे चिंतन करुया. जयंतीच्या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवाद ! सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य येथे पहा

हे सुद्धा वाचा 

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.
   

Previous Post Next Post