Old Pension Scheme : राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, संपाबाबत अखेर शासन निर्णय निघाला येथे पहा

Old Pension Scheme News : जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करावी यासाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी (State Government Employeesबेमुदत संप पुकारला होता, यादरम्यान संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कपात करण्याबाबत सांगण्यात आले होते, मात्र पुन्हा सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री यांची संघटनानी  भेट घेऊन संप काळातील पगार कपात करण्यात येऊ नये याबाबत विनंती केली होती, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार  शासन निर्णय काढण्यात आला असून, याचा राज्यातील कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे.

अखेर ! जुनी पेन्शन योजना बेमुदत संपातील कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा

Old Pension Scheme News

जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, यासाठी मार्च महिन्यात पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येऊ नये असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

राज्य समन्वय समिती यांनी 3 एप्रिल 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, Old Pension Scheme बेमुदत संपात सहभागी झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती. त्यावेळी मा. मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी व शिक्षकांची वेतन कपात करु नका असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार आता प्रत्यक्ष शासन निर्णय काढण्यात आला आहे, त्यानुसार आता राज्यातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

संपकाळातील कर्मचाऱ्यांची असाधारण रजा आता अर्जित रजा होणार

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात दिनांक 14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीत संप पुकारला होता. 

Old Pension Scheme या पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी ,अधिकारी सहभागी झाले होते, त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पुर्वोदाहरण होणार नाही या अटीवर 'असाधारण रजा' ऐवजी 'अर्जित रजा' करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसा शासन निर्णय निर्गमित केला असून येथे पहा शासन निर्णय

जुनी पेन्शन योजना रजेबाबत चा GR येथे पहा 👇🏻

{getButton} $text={Download} $icon={download}

                                                           
Previous Post Next Post