मोठी बातमी ! 'जुनी पेन्शन' संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा - मुख्यमंत्र्यांचे आदेश

OLD Pension Scheme in Maharashtra Latest News : जुनी पेन्शन योजना समन्वय समिती यांनी 3 एप्रिल 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, बेमुदत संपात सहभागी झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करू नका अशी यावेळी विनंती करण्यात आली, यावेळी मा. मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी व शिक्षकांची वेतन कपात करु नका असे स्पष्ट आदेश दिले आहेत. या बैठकीला मुख्य सचिवांसह संबंधित सर्व सचिवांच्या उपस्थितीत हे निर्देश देण्यात आले, त्यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जुनी पेन्शन योजना बेमुदत संप

OLD Pension Scheme in Maharashtra Latest News :

राज्यातील सरकारी कर्मचार्यांनी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासाठी 14 मार्च ते 20 मार्च या कालावधीत बेमुदत संप पुकारला होता, मात्र सरकारने कर्मचार्यांना संप मागे घेण्याबाबत वेळोवेळी आवाहन केले होते, यादरम्यान शासनाने संपात सहभागी असलेल्या State Government Employees यांची दररोज माहिती मागवण्यात आली होती, त्यामध्ये राज्यातील बहुतांश कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.

वेतन कपात करू नका मुख्यमंत्र्यांचे निर्देश

संपातील काळ हा नियमित सेवेत ग्राह्य धरावा, या कालावधीत असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत शासनाने GR काढला होता मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतना बाबत संदिग्ध ठेवण्यात आले होते, त्यामुळे जुनी पेन्शन योजनेच्या समन्वय समिती ने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वेतन कपात करू नका अशी विनंती केली यावर मुख्यमंत्र्यानी संबंधितांना याबाबत वेतन कपात करू नका असे निर्देश दिले आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्या

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                            

Previous Post Next Post